breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारणराष्ट्रिय

‘एकदाच आम्हाला गोळ्या घालून..’; हसन मुश्रीफांच्या पत्नीची संतत्प प्रतिक्रिया

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्याविरोधात ईडीची कारवाई सुरू आहे. कारवाईच्या विरोधात मुश्रीफ यांचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. त्यांच्या कार्यकर्त्यांनी मुश्रीफ यांच्या घराबाहेर गर्दी केली आहे. कार्यकर्ते भाजपाच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी करत आहेत. तसेच ईडीच्या अधिकाऱ्यांना येथून बाहेर जाऊ देणार नाही, असा पवित्रा तेथील कार्यकर्त्यांनी घेतला आहे.

हसन मुश्रीफ यांच्या विरोधातील कारवाईनंतर त्यांच्या पत्नी सायरा मुश्रीफ यांनी संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आम्हाला गोळ्या घालून जा. समाजासाठी मुश्रीफ साहेब एवढं काम करतात. मात्र, असे असले तरी ईडीकडून त्यांना त्रास दिला जात आहे. आम्हाला किती त्रास देणार आहात, आम्हाला गोळ्या मारून टाका, अशी संतप्त प्रतिक्रिया मुश्रीफ यांच्या पत्नीने दिली आहे.

दरम्यान, कोल्हापुरातील साखर कारखाना खरेदी व्यवहारात गैरप्रकार झाल्याचा आरोप भारतीय जनता पक्षाचे नेते किरीट सोमय्या यांनी केला होता. या व्यवहारात काळा पैसा गुंतविण्यात आल्याचेही ते म्हणाले. तसेच मुश्रीफ यांच्या निकटवर्तीयांनी साखर कारखाना खरेदी केल्याचा आरोपही त्यांनी केला होता. त्यानंतर ईडीकडून मुश्रीफ यांच्या पुणे आणि कोल्हापुरातील मालमत्तांवर छापे टाकून कारवाई करण्यात आली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button