breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भोसरीत पैलवानांचा वस्तादावरच डाव, मांड्या थोपटून केला जल्लोष

  • माजी आमदार विलास लांडे पराभवाच्या छायेत
  • महेश लांडगे यांना 77 हजार 370 मतांची आघाडी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

भोसरी विधानसभा मतदार संघाचे भाजपचे उमेदवार आमदार महेश लांडगे यांनी जोरदार आघाडी घेतली आहे. 1 लाख 58 हजार 898 मताधिक्य घेऊन अपक्ष उमेदवार माजी आमदार विलास लांडे यांना पराभवाच्या सावटात टाकले आहे. महेश लांडगे यांनी 77 हजार 370 मतांची लीड घेऊन भोसरीत ताकद दाखवून दिली आहे. पैलवान असलेल्या आमदार लांडगे आणि त्यांच्या दोन महापौरांनी मांड्या थोपटून विजयाचा जल्लोष केला आहे.

निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात अपक्ष उमेदवार माजी आमदार लांडे यांनी आमदार महेश लांडगे यांना जोरदार टस्सल दिली होती. त्यातच शिवसेनेच्या काही स्थानिक कार्यकर्त्यांनी ध्रुवीकरण केल्यामुळे राजकीय समज गैरसमज वाढले होते. त्यामुळे महेश लांडगे यांना ही निवडणूक अवघड मानली गेली होती. परंतु, मतदारांनीच विरोधकांना त्यांची जागा दाखवून दिली आहे. तब्बल 77 हजार 370 मतांची आघाडी घेऊन महेश लांडगे विजयाच्या उंबरठ्यावर आहेत.

दादा समर्थकांकडून भोसरीत जल्लोष

एवढे मताधिक्य आता तुटू शकत नसल्याने भोसरी विधानसभा मतदार संघात महेश लांडगे यांच्या कार्यकर्त्यांकडून जल्लोष केला जात आहे. महेश लांडगे स्वतः पैलवान असल्याने त्यांनी दंड आणि मांड्या थोपटून ताकद दाखवून दिली आहे. सोबत महापौर राहूल जाधव आणि माजी महापौर नितीन काळजे यांनी देखील मांड्या थोपटून विजयाचा जल्लोष केला आहे. गुलाल आणि भंडारा उधळून कार्यकर्त्यांनी केला जल्लोष.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button