breaking-newsमहाराष्ट्र

भीषण आगीत गुदमरून मुलाचा मृत्यू, तर आई-वडिल आणि बहिण गंभीर भाजले

औरंगाबाद | महाईन्यूज

इमारतीला भीषण आग लागल्याने वरच्या मजल्यावरील घरात गुदमरून एका 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला. मृत मुलाची आई, बाबा आणि बहीण आगीत गंभीर भाजले आहेत. तिघांवर रुग्णालयात उपचार सुरू आहे. ही घटना गुरुवारी (दि. 27) पहाटे पाच वाजेच्या सुमारास शहरातील उल्कानगरी भागात घडली.

संस्कार शामसुंदर जाधव (वय 14) असे मृत मुलाचे नाव आहे. तर, शामसुंदर बाबासाहेब जाधव (वय 45), सविता शामसुंदर जाधव (वय 39), संस्कृती शामसुंदर जाधव (वय 19) अशी जखमींची नावे आहेत. त्यांच्यावर हेडगेवार रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मुळचे पैठण तालुक्यातील करंजखेडा येथील शामसुंदर जाधव यांचा एलईडी व सोलर ऊर्जाच्या उपकरण विक्रीचा व्यवसाय आहे. गेल्या एक वर्षांपूर्वी अविनाश पाठक यांच्या सहा खोल्यांच्या बंगल्यात जाधव कुटुंबीय भाडेतत्वावर राहतात. बुधवारी रात्री कुटुंबय झोपी गेले असताना इमारतीच्या खालच्या मजल्यावर शॉर्टसर्किट होऊन घराच्या पाठीमागील खोलीत अचानक भीषण आग लागली. त्यामुळे एलईडी बल्ब आणि सोलर ऊर्जाच्या उपकरणांनी पेट घेतला. त्यामुळे परिसरात आणि घरात धुराचे लोळ पसरले. धुराने जीव गुदमरत असल्याने जाधव कुटुंबियांनी दुसऱ्या मजल्यावर धाव घेतली.

धुरापासून बचाव करण्यासाठी दुसऱ्या मजल्यावरील खोलीचा दरवाजा आणि खिडक्या आतून लावण्यात आल्या. मात्र, तोपर्यंत धुराने विळखा घातला होता. शॉर्टसर्किटमुळे घरातील विद्युत पुरवठा खंडीत झाला होता. जीव गुदमरत असल्याने जाधव कुटुंबियांनी आरडा-ओरड सुरू केली. त्यांचा आवाज ऐकूण पाठीमागील अपार्टमेंटमध्ये राहणाऱ्या इतर कुटुंबियांनी तात्काळ धाव घेतली. आगीच्या घटनेची माहिती अग्निशमन दलासह जवाहरनगर पोलिसांना कळवण्यात आली.

अग्निशमन दल दाखल होईपर्यंत परिसरातील नागरिकांनी पाण्याने आग आटोक्यात आणण्याचा प्रयत्न केला. अग्निशमन दलाचे कर्मचारी बंबासह दाखल झाल्यावर जाधव कुटुंबीयांच्या बचावासाठी दुसऱ्या मजल्यावर पोहोचण्यासाठी शिडीचा वापर केला. या मजल्यावरील खिडकी आणि दरवाजा तोडला. जाधव कुटुंबिय बेशुद्धावस्थेत पडलेले आढळून आले. कुटुंबातील सर्व सदस्यांना तात्काळ खासगी वाहन आणि रुग्णवाहिकेने हेडगेवार रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, संस्कारला डॉक्टरांनी मृत घोषित केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button