breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

उल्हासनगरात ‘द बर्निंग कार’

मुंबईतील उल्हासनगरमध्ये पेट्रोलपंपावरच गाडीला आग लागल्याची घटना मंगळवारी दुपारी घडली. सुदैवाने या घटनेत कुणालाही इजा झाली नाही. उल्हासनगरच्या सेक्शन १७ च्या चौकात असलेल्या एचपी पेट्रोलपंपावर हा प्रकार घडला.

आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास एचपी पंपावर एक कार पेट्रोल भरण्यासाठी आली होती. यावेळी पेट्रोल भरून झाल्यावर गाडी सुरू करताना अचानक गाडीच्या इग्निशन प्लग आणि बॅटरीमध्ये स्पार्क होऊन गाडीला आग लागली. यावेळी पेट्रोलपंपावर उपस्थित कर्मचाऱ्यांनी तातडीनं ही गाडी ढकलत बाहेर नेली आणि आग विझवली. त्यामुळे पेट्रोलपंपावर मोठा अनर्थ टळला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button