breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारत-वेस्ट इंडिज सामन्याआधीच योगी सरकारने बदलेले इकाना स्टेडियमचे नाव

लखनऊ – भारत-वेस्ट इंडिज दरम्यान आज दुसरा टी-२० सामना लखनऊ येथील इकाना स्टेडियमवर होणार आहे. परंतु, त्याआधीच योगी सरकारने या स्टेडियमचे नाव बदलेले आहे. उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी इकाना स्टेडियमचे नाव बदलून भारतरत्न अटल बिहारी वाजपेयी इकाना स्टेडियम असे केले आहे. आज सकाळीच अधिकृतपणे योगी आदित्यनाथ आणि उत्तरप्रदेशचे राज्यपाल राम नाईक यांच्या उपस्थित स्टेडियमचे नाव बदलण्यात आले.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI UP

@ANINewsUP

Lucknow: UP CM Yogi Adityanath inaugurates ‘Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium’. Ekana Cricket Stadium was yesterday renamed as ‘Bharat Ratna Atal Bihari Vajpayee Ekana Cricket Stadium’

स्टेडियमच्या परिसरात सरकारच्या वेगवेगळ्या योजनांच्या होर्डिंग्ज लावण्यात आले आहेत. परंतु, समाजवादी पक्षांनी यावर आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, जवळपास ५० हजार प्रेक्षक एका वेळेस बसू शकतील एवढी या स्टेडियमची क्षमता आहे. नव्याने बांधण्यात आलेल्या या स्टेडियमवर पहिल्यांदाच सामना होत असल्याने खेळपट्टीचा अनुभव दोन्ही संघाना नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button