ताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडराजकारण

चिंचवड भागातील महापालिका शाळांमध्ये मैदान, क्रीडा सुविधा उपलब्ध करून द्या

राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांची आग्रही मागणी

पिंपरी : स्मार्ट सिटी म्हणून वाटचाल करू पाहणार्‍या पिंपरी चिंचवड महापालिकेच्या १०५ शाळांपैकी तब्बल २२ शाळांना खेळाचे मैदानच नाही. एकीकडे स्मार्ट व डिजिटल शिक्षणावर भर देताना दुसरीकडे क्रीडा विषयाकडे मात्र दुर्लक्ष केले जात आहे. आकुर्डी, काळभोर नगर, मोहननगर चिंचवड भागातील महापालिका शाळांसह इतर शाळांमध्ये मैदान, क्रीडा प्रशिक्षकांसह विविध सुविधा उपलब्ध करून द्या अशी आग्रही मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेश सरचिटणीस विशाल बाळासाहेब काळभोर यांनी केली आहे.

याबाबत काळभोर यांनी महापालिकेच्या शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, क्रीडा विभागाचे उपायुक्त मिनीनाथ दंडवते यांना आज शुक्रवारी (दि.१) निवेदन दिले आहे.

काळभोर यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, पिंपरी चिंचवड शहर आज स्मार्ट सिटी, मेट्रो सिटी म्हणून ओळखले जात आहे. मात्र महापालिकेच्या शाळांमध्ये मैदान, क्रीडा प्रशिक्षकांसह विविध सुविधांचा अभाव आहे. महापालिकेच्या बहूतांशी शाळा रस्त्यालगत असल्याने या शाळांना मैदान उपलब्ध नाही. महापालिकेच्या शाळेत गोर-गरीब घरातील विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी महापालिकेच्या क्रीडा आणि शिक्षण विभागाच्या वतीने प्रयत्न करणे अपेक्षित आहे. मात्र, हे प्रयत्न होताना दिसून येत नाहीत. कोरोना कालावधीनंतर मुलांसाठी मैदानावर खेळाच्या कोणत्याही सुविधा देण्यात येत नाहीत.

हेही वाचा – ‘इंडिया’ची पुढची रणनीती मुंबईतल्या बैठकीत ठरली? मल्लिकार्जुन खरगे म्हणाले..

आकुर्डी, काळभोर नगर, मोहननगर, चिंचवड महापालिका शाळांसह इतर शाळांमधील मैदानाची दुरावस्था झाली असून या ठिकाणी सुविधा उपलब्ध करून द्या. मैदानावर खो-खो, कबड्डी, मलखांब, लांब उडी, गोळा फेक, थाळी फेक, भाला फेक, उंच उडी, लांब उडी, क्रिकेट, हॉकी, फुटबॉल, व्हॉलीबॉल, यासह आदी मैदानी खेळासाठी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. तसेच सर्व शाळेमध्ये प्रशिक्षित प्रशिक्षक नेमावेत, अशी मागणी काळभोर यांनी केली आहे.

याबाबत विशाल काळभोर म्हणाले, शिक्षण विभागाचे सहाय्यक आयुक्त थोरात आणि क्रीडा विभागाचे उपायुक्त दंडवते यांच्याशी महापालिकेच्या शाळेत क्रीडा सुविधा उपलब्ध करून देण्या संदर्भात सकारात्मक चर्चा झाली आहे. उपायुक्त दंडवते यांनी महापालिकेसह सर्वच शाळेतील विद्यार्थ्यांना व शहरातील खेळाडुंसाठी संपूर्ण शहरात सर्व सुविधांसह खेळांचे मैदाने, स्विमिंग पुल, स्केटिंग ग्राउंड, लाँग टेनिस, बॅडमिंटन, बास्केटबॉल, अत्याधुनिक जिम, स्विमिंग पुलसह सर्व प्रकारच्या खेळांबाबत व खेळाडुंच्या विविध सुविधांबाबत सविस्तर सकारात्मक चर्चा झाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button