breaking-newsराष्ट्रिय

अयोध्यानगरी राममय, योगींच्या गुडन्यूजमुळे संतांची नाराजी दूर?

वसुबारस या दिवसापासूनच दिवाळीची सुरुवात होते. मात्र नरकचतुर्दशी, लक्ष्मीपूजन आणि पाडवा या दिवसांना अधिक महत्त्व आहे. दिवाळीच्या दिवसांमध्ये प्रभू रामचंद्रांचीही पूजा करण्याची प्रथा आहे. तसेच सध्या देशात राम मंदिराचा मुद्दाही प्रचंड गाजतो आहे. याच पार्श्वभूमीवर अयोध्या नगरी राममय झाली आहे. अयोध्येत आज ऐतिहासिक दीपोत्सव साजरा केला जाणार आहे. दक्षिण कोरियाच्या प्रथम महिला किम जंग सूक या देखील या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. त्या सोमवारीच लखनऊमध्ये पोहचल्या आहेत.

View image on TwitterView image on TwitterView image on Twitter

ANI UP

@ANINewsUP

Preparations underway for in Ayodhya today. South Korean First Lady Kim Jung-sook will take part in the the festival.

सकाळी ११.३० च्या सुमारास शोभायात्रा काढण्यात आली आहे. ही शोभायात्रा अयोध्येतून फिरून दुपारी ३.३० पर्यंत संपेल असा अंदाज आहे. रामकथा पार्क या ठिकाणी या शोभायात्रेचा समारोप होणार आहे. रामकथा पार्क या ठिकाणीच विदेशी कलाकार कार्यक्रम सादर करणार आहेत. या कार्यक्रमात योगी आदित्यनाथ नेमकी काय घोषणा करणार याकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं आहे. राम मंदिराबाबत काही घोषणा योगी आदित्यनाथ करणार का? याची चर्चा रंगली आहे. तर दुसरीकडे शरयू नदीच्या किनाऱ्यावर रामाचा भव्य पुतळा उभारण्यासंबंधीची अधिकृत घोषणा केली जाण्याची शक्यता आहे.

आम्हाला भव्य पुतळा नको आम्हाला राम मंदिरच हवे आहे अशी भूमिका संत समाजाने घेतली आहे. तरीही रामाच्या भव्य पुतळ्याची घोषणा होऊ शकते असेच म्हटले जाते आहे. आता योगी आदित्यनाथ नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणे महत्त्वाच ठरणार आहे. ते जे काही भूमिका घेतील किंवा घोषणा करतील त्याला विरोध होण्याचीही शक्यता नाकारता येत नाही.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button