breaking-newsक्रिडामहाराष्ट्र

कोल्हापूरचा कुस्तीपटू निलेश कंदूरकरचे निधन

कराड – कोल्हापूरच्या शाहूवाडी तालुक्यातील बांदवडे येथे कुस्ती खेळताना गंभीर जखमी झालेल्या निलेश कंदुरकरची मृत्यूशी झुंज अखेर अपयशी ठरली. कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये आज पहाटे ४ वाजता त्याचा मृत्यू झाला. निलेशच्या मृत्यूने कुस्ती क्षेत्रावर शोककळा पसरली आहे.

बांदवडे येथे आखाड्यामध्ये निलेश गंभीर जखमी झाला होता. त्यांनतर त्याला कोल्हापूर येथे उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र प्रकृती बिघडल्याने त्याला मुंबईला नेण्यात येत होते पण वाटेतच त्याला अत्यवस्थ वाटू लागल्याने कराडच्या कृष्णा हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले होते

कोल्हापुरातील बांदिवडे येथे जोतिबा यात्रेनिमित्त १ एप्रिलला मैदान भरवण्यात आले होते. या मैदानात 20 वर्षीय पैलवान निलेश उतरला होता. कुस्ती खेळताना प्रतिस्पर्धी पैलवानाने निलेशला आपल्या कवेत धरत उचलून जमिनीवर आपटले. या डावात निलेश डोक्यावर आदळून जमिनीवर निपचित पडला त्यानंतर त्याला उपचारासाठी दवाखान्यात हलवण्यात आले होते. तसेच उपचारासाठी सर्वच स्तरातून मदतीचे आवाहन देखील करण्यात आले होते.

निलेश कंदूरकर हा पन्हाळा तालुक्यातील.बादेवाडी येथील कुस्तीची परंपरा असलेल्या घरातील. त्याच्या घरात आजोबा, वडील पै. विठ्ठल कंदूरकर, वडिलांचे मामा वस्ताद कै.सावळा गवड हे नामांकित पैलवान होते. त्यामुळे मुलगाही पैलवान व्हावा यासाठी ते प्रयत्न करत होते. मात्र रविवारी झालेल्या कुस्ती मैदानात निलेशला गंभीर दुखापत झाली. त्याच्या मृत्यूने घरावर आभाळच कोसळले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button