breaking-newsआंतरराष्टीय

भारत दौऱ्यापूर्वीच शेख हसिना यांना इम्रान खान यांचा दूरध्वनी

  • काश्मीर प्रश्नावर पाठिंब्यासाठी आटापिटा

ढाका : बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसिना यांच्या नियोजित भारत दौऱ्यापूर्वीच पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी हसिना यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. केंद्र सरकारने जम्मू-काश्मीरचा विशेष दर्जा रद्द केल्यानंतर पाकिस्तानला काश्मीर प्रश्नावर पाठिंबा मिळावा यासाठी इम्रान खान जगभरातील मुस्लीम नेत्यांशी संपर्क साधण्याचा आटापिटा करीत आहेत.

शेख हसिना यांचे माध्यम सचिव एहसानूल करीम यांनी सांगितले की, बुधवारी इम्रान खान यांनी हसिना यांच्याशी संपर्क साधला आणि दोन्ही नेत्यांमध्ये हसतखेळत चर्चा झाली. शेख हसिना यांच्या डोळ्यावर अलीकडेच लंडनमध्ये शस्त्रक्रिया करण्यात आली होती त्याबाबतही इम्रान खान यांनी हसिना यांची विचारपूस केली आणि हसिना यांनी त्याबाबत खान यांचे आभार मानले, असे करीम म्हणाले.

इम्रान खान पाकिस्तानचे पंतप्रधान झाल्यानंतर त्यांनी प्रथमच हसिना यांच्याशी अशा प्रकारची चर्चा केल्याचे बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील संबंधांची माहिती असलेल्या अधिकाऱ्याने सांगितले. गेल्या काही दशकांमध्ये बांगलादेश आणि पाकिस्तान यांच्यातील संबंध तणावाचे आहेत. युद्ध गुन्हेगारांवर कारवाई करण्यात आल्यानंतर दोन्ही देशांनी एकमेकांच्या राजनैतिक अधिकाऱ्यांची हकालपट्टी केली आहे.

शेख हसिना यांचे गुरुवारी भारतामध्ये चार दिवसांच्या भेटीसाठी आगमन झाले असून त्या वर्ल्ड इकॉनॉमिक फोरमच्या (डब्ल्यूईएफ) इंडिया इकॉनॉमिक परिषदेत सहभागी होणार आहेत. त्याचप्रमाणे हसिना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी चर्चाही करणार आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button