breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

भारतीय वंशाच्या महिला प्राध्यापकने कोरोनाला अटकाव करणारी लस विकसित केली; ऑस्ट्रेलियात चाचणी सुरू

संपूर्ण जगाला विळखा घातलेल्या कोरोना संसर्गाला अटकाव करण्यासाठी विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. काही देशांकडून लस विकसित करण्याचे जोरदार प्रयत्न सुरू असून काहींची तिसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ब्रिटनमधील ऑक्सफर्ड विद्यापीठातील भारतीय वंशाच्या प्राध्यापक सुमी विश्वास यांनी कोरोनाला अटकाव करणारी एक लस विकसित केली आहे. या लशीची चाचणी ऑस्ट्रेलियासह अनेक देशांमध्ये होत आहे.

प्रा. सुमी विश्वास यांनी २०१७ मध्ये ब्रिटनमध्ये स्पाई बायोटेक नावाची कंपनी स्थापन केली. या कंपनीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर त्या कार्यरत आहेत. सुमीविश्वास यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठाच्या जेनर इन्स्टिट्यूटमध्ये एड्रियन हिल आणि सारा गिलबर्ट यांच्यासोबत एकत्र काम केले आहे. या जेनर इन्स्टिट्यूटने एस्ट्राजेनकासोबत करोनावर लस विकसित केली आहे.

प्रा. सुमी विश्वास यांच्या स्पाई बायोटेकने विकसित केलेल्या लशीची मानवी चाचणी सुरू आहे. ऑस्ट्रेलियात या लशीची चाचणी सुरू आहे. सध्या दुसऱ्या टप्प्यातील चाचणी सुरू आहे. ही चाचणी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी असलेल्या भारतातील सिरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाच्यावतीने संचलित केली जात आहे. सिरम इन्स्टिट्यूटसोबत सुमी विश्वास यांच्या स्पाय बायोटेक कंपनीने लस उत्पादनाबाबतचा करार केला आहे.

प्राध्यापक सुमी विश्वास यांचा जन्म कोलकातामधील लेक टाऊन भागात झाला. बंगळुरू विद्यापीठातून त्यांनी मायक्रोबॉयोलॉजीमधून शिक्षण पूर्ण केले. त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून पीएचडी पूर्ण केली. ऑक्सफर्डच्या जेनर इन्स्टिट्यूटसोबत मलेरियाविरोधातील लस विकसित करण्यासाठी काही वर्ष काम केले आहे.

दरम्यान, करोनाच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर लस विकसित करण्याचे अनेक देश प्रयत्न करत आहेत. तर, दुसरीकडे लस विकसित झाल्यानंतर त्याचे योग्य वितरण झाले पाहिजे यासाठी प्रयत्न सुरू आहेत. जागतिक आरोग्य संघटना आणि भारता दरम्यान करोना लशीबाबत चर्चा सुरू आहे. जागतिक आरोग्य संघटनेचे वरिष्ठ सल्लागार ब्रूस आयलवर्ड यांनी ही माहिती दिली. कोवॅक्स फॅसिलिटीचा हिस्सा बनण्यासाठी भारतदेखील पात्र असल्याचे त्यांनी म्हटले. जागतिक आरोग्य संघटना आणि ‘गावी द वॅक्सीन अलायन्स’ या कोवॅक्स फॅसिलिटीचे नेतृत्व करत आहेत. या माध्यमातून जगभरात करोनाला अटकाव करणाऱ्या लस खरेदी करणे आणि त्याच्या लस वितरणात मदत करण्यात येणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button