breaking-newsताज्या घडामोडीमराठवाडा

प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हाध्यक्ष बनावट नोटा प्रकरणी ताब्यात

हिंगोली | हिंगोली जिल्ह्यातील बनावट नोटा प्रकरणात आता राजकीय कनेक्शन समोर येत आहे. प्रहार जनशक्ती पक्षाचे पांढरकवडा-वणी जिल्हाध्यक्ष विलास पवार यांना हिंगोली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. विलास पवार यांना रात्री हिंगोलीत आणले आहे. त्याचबरोबर विलास पवार यांचा या प्रकरणात थेट सहभाग आहे की, नोटांचा विनियोग करण्यात ते मदत कात होते याचा तपास हिंगोली पोलीस करत आहेत.

मूळचा यवतमाळ जिल्ह्यातील महागाव तालुक्यातील असणारा विलास पवार सध्या पांढरकवडा येथे स्थायिक झाला आहे. बनावट पदव्यांच्या प्रकरणातही विलास पवार याचे नाव चर्चेत होते. त्याचबरोबर वाळू तस्करी प्रकरणात, एका कथित सीएची ३५ लाख रुपयांची फसवणूक, त्याचबरोबर अन्य १ कोटींच्या प्रकरणातही विलास पवार याचे नाव आले होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button