breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

मुंबईतील एन आणि एल विभागात दोन दिवस पाणीपुरवठा बंद

मुंबई – मुंबईला पाणीपुरवठा करणार्‍या 2750 मिलीमीटर व्यासाच्या उर्ध्व वैतरणा जलवाहिनीच्या दुरुस्तीचे काम हाती घेण्यात आले आहे. आग्रा रोड व्हॉल्व्ह संकुल ते पोगावदरम्यान येवई येथील क्लोरिन इंजेक्शन पॉइंटच्या दुरुस्तीचे काम 22 डिसेंबर रोजी होणार आहे. त्यामुळेमुंबईतल्या एन आणि एल विभागात पाणीपुरवठादोन दिवस पूर्णतः बंद राहणार असून, काही ठिकाणी पाणीपुरवठ्यात 15 टक्क्यांची कपात होणार आहे. 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 ते 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 दरम्यान 24 तासांसाठी मुंबईत 15 टक्के पाणीकपात करण्यात आली आहे.

या दुरुस्ती कामामुळे मुंबईच्या पाणीपुरवठ्यामध्ये मंगळवार 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बुधवार 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजेपर्यंत 24 तासांच्या कालावधीत 15 टक्के पाणीकपात करण्यात येणार आहे. तसेच मंगळवार 22 डिसेंबर रोजी एन विभागामध्ये घाटकोपर उच्चस्तर जलाशय येथे कप्पा एकला पाणीपुरवठा करणार्‍या 1400 मिलीमीटर व्यासाच्या मुख्य जलवाहिनीवरील 1400 मिलीमीटर व्यासाची झडप बदलण्याचे काम नियोजित आहे. हे काम मंगळवारी 22 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजल्यापासून बुधवार, 23 डिसेंबर रोजी सकाळी 6 वाजेपर्यंत हाती घेण्यात येणार आहे. या कामामुळे काही भागांमध्ये मंगळवारी 22 डिसेंबर पाणीपुरवठ्यामध्ये 15 टक्के कपात करण्यात येईल.तर एन आणि एल विभागातील काही भागात पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button