breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजनमुंबई

कंगनाच्या ऑफिसमधील अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात

मुंबई – एकीकडे कंगना रनौत मुंबईला येण्यासाठी चंदीगडहून निघाली आहे, त्याचवेळी इथे मुंबईत कंगनाच्या कार्यालयातील अनधिकृत बांधकामावर कारवाईला सुरुवात झाली आहे. महापालिकेने कंगनाच्या कार्यालयाच्या तळमजल्यावर कारवाई सुरु केली आहे. कार्यालयातील 12 अनधिकृत बांधकामावर कारवाई केली जाणार आहे. कंगनाच्या पाली हिलमधील कार्यालयाबाहेर मोठा पोलीस फौजफाटा तैनात करण्यात आला असून, महापालिकेचे अधिकारी आणि कर्मचारी दाखल झाले आहेत. हातोडा, फावडा, कुदळ घेऊन आलेले 50 पेक्षा जास्त कर्मचारी कारवाई करत आहेत. महापालिका दोन कॅमेऱ्यातून या कारवाईचं चित्रीकरण केलं जाणार आहे.

कंगनाच्या कार्यालयाच्या बांधकामाबाबत तक्रारी आल्या होत्या. त्यांना उत्तर देण्यासाठी मुदत दिली होती. महापालिका सगळ्यांना वेळ देते. अवैध बांधकामावर कारवाई केली नाही तर तुम्हीच बोलणार. ही कारवाई अवैध बांधकामावरच होत आहे. नियमित बांधकामावर होत नाही, अशी प्रतिक्रिया मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी कारवाईबाबत दिली.

दरम्यान कंगना रनौतने या तोडक कारवाईचे फोटो ट्वीट करुन ‘पाकिस्तान’असं कॅप्शन दिलं आहे. शिवाय #deathofdemocracy हा हॅशटॅगही वापरला आहे.

https://twitter.com/KanganaTeam/status/1303572126817857536?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1303572126817857536%7Ctwgr%5Eshare_3&ref_url=https%3A%2F%2Fmarathi.abplive.com%2Fentertainment%2Fbollywood%2Fkangana-ranauts-property-bmc-starts-action-against-illegal-structure-in-kanganas-office-806308
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button