breaking-newsपुणे

‘भारतातील फौजदारी न्याय प्रणाली’मधील ‘परिवर्तन’ यावर ऑनलाईन चर्चासत्र

पुणे |महाईन्यूज|

सिम्बायोसिस अंiतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या सिम्बायोसिस विधी महाविद्यालयात सोमवारी (दि.19) दुपारी ३ ते सायंकाळी ७.३० पर्यंत ‘भारतातील फौजदारी न्याय प्रणालीचे परिवर्तन ’ या विषयावरील ऑनलाईन चर्चासत्राचे आयोजन केले होते.

केंद्र सरकारचा उद्धेश केंद्रीय फौजदारी कायदेप्रणाली मध्ये परिवर्तन आणणेचा आहे. प्रामुख्याने भारतीय दंड विधान, फौजदारी प्रक्रिया संहिता, भारतीय पुरावा कायदा आणि अमली पदार्थ सेवन विरोधी कायदा यामध्ये सामान्यांना आर्थिक दृष्ट्या परवडणारे आणि लोकाभिमुख बदल करणे गरजेचे आहे. म्हणूनच भारत सरकारच्या गृह मंत्रालयाने सिंबायोसिस लॉ स्कूल पुणे ला भारतीय फौजदारी कायद्याचा आढावा घेण्याच्या प्रक्रियेत आमंत्रित केलेले आहे.

सिंबायोसिस विधी महाविद्यालय पुणे ने संबंधित साहित्याचा आढावा घेतला आणि फौजदारी कायद्यातील त्रुटी समजून घेण्यासाठी न्यायाधीश, सरकारी वकील, वकील, शिक्षणतज्ज्ञ, पोलिस , निम सरकारी संस्था , प्रसारमाध्यमे, आणि कारागृह अधिकारी, यासह १२० हून अधिक फौजदारी प्र्क्रेयेतील प्रत्यक्ष्य आणी अप्रत्यक्ष भागधारकांकडून माहिती गोळा केली.

डॉ. शशिकला गुरपूर, संचालिका आणि अधिष्ठता, कायदा शाखा सिम्बायोसिस अंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठ यांनी स्वागत व विषयांची ओळख करुन दिली. आणि सिम्बायोसिस विधी महाविद्यालयाच्या परंपरेनंतर समाजातील कायदेशीर सुधारणेतील योगदानाबद्दल माहिती दिली. तसेच सदर कार्यक्रमाबद्दल विशेषतः संशोधन आणि फौजदारी प्रक्रियेबद्दल बोलल्या.

डॉ. बिंदू रोनाल्ड, उपसंचालिका , सिम्बॉसिस विधी महाविद्यालय , पुणे यांनी उपस्थित मान्यवरांचा परिचय करून दिला. या कार्यक्रमामध्ये ठराविक विषयानुसार सिम्बायोसिस च्या टीम ने सुचवलेल्या शिफारशींचा आढावा घेण्यात आला आणि प्रत्येक विषयानंतर ऑनलाईन प्रश्नावली पाठवून त्यावरती ऑनलाईन पद्धतीनेच मते घेण्यात आली.

पहिल्या पॅनेलचे मॉडेरेशन डॉ.शशिकला गुरपुर तसेच डॉ. आत्माराम शेळके, वरिष्ठ सहाय्यक प्राध्यापक यांनी केले. ‘पोलिस अधिकारी व सरकारी वकील यांच्यात समन्वय ठेवून शिक्षेमधील अपेक्षित वाढ’ या विषयावर पॅनेलवर चर्चा झाली. यामध्ये विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम, अ‍ॅड. एस.के. जैन, अ‍ॅड. हितेश जैन, निवृत्त पोलीस अधिकारी श्री भानुप्रताप बर्गे आणि महाराष्ट्र टाईम्स चे पत्रकार श्री रोहित आठवले हे सहभागी होते. डॉ. बिंदू रोनाल्ड, डायरेक्टर  उप- संचालिका, सिम्बायोसिस लॉ स्कूल, पुणे यांनी आभारप्रदर्शन केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button