breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

‘मतांसाठी राजीव, इंदिरा गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने…’ राममंदिराच्या निधीवर भाजपचे प्रत्युत्तर

मुंबई – रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा असून राम मंदिरासाठी भाविकांनी दिलेला निधी सचिन सावंत आरएसएसकडून लुबाडला जाऊ शकतो, अशी शक्यता काँग्रेसचे नेते सचिन सावंत यांनी व्यक्त केली होती. काँग्रेसच्या या टीकेला भाजपकडून जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले आहे.मतांसाठी इंदिरा गांधी, राजीव गांधींचे अस्थिकलश गावोगावी फिरवणाऱ्या काँग्रेसने राममंदिराच्या निधीची उठाठेव करू नये, असा टोला भाजप नेते केशव उपाध्ये यांनी लगावला आहे.

वाचा :-रामाच्या नावाने चंदा हाच भाजपाचा धंदा’, सचिन सावंताची चौकशीची मागणी

केशव उपाध्ये म्हणाले की, राम मंदिरासाठी सामान्य माणूस स्वतःहून निधी देऊ लागल्याने काँग्रेसी मंडळींचा पोटशूळ झाला आहे. त्यामुळेच निधी योग्य ठिकाणी जातोय की नाही, याची चिंता काँग्रेस पक्षाला वाटू लागली आहे. राम मंदिरासाठी होत असलेले निधी संकलन पूर्णतः पारदर्शक पद्धतीने होत आहे.ज्या काँग्रेस पक्षाचे सर्वोच्च नेतृत्व नॅशनल हेराल्ड गैरव्यवहार प्रकरणी जामिनावर आहे, अशा पक्षाच्या प्रदेश प्रवक्त्यांना सगळीकडे गैरव्यवहारच दिसत असणार. राममंदिराचा निधी नॅशनल हेराल्डप्रमाणे अन्यत्र वळविला जाणार नाही, याची सामान्य माणसाला खात्री आहे, असे जोरदा प्रत्युत्तर त्यांनी दिले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button