breaking-newsताज्या घडामोडीपुणे

प्रसिद्ध उद्योगपती गौतम पाषाणकर बेपत्ता झाल्यांनतर सापडली सुसाईड नोट

पुणे |महाईन्यूज|

पुण्यातील वाहन उद्योग क्षेत्रातील पाषाणकर ग्रुपचे व्यवस्थापकीय संचालक गौतम पाषाणकर हे बुधवारी (दि. २१) सायंकाळपासून बेपत्ता झाले आहेत. यासंदर्भात त्यांचे पुत्र कपिल पाषाणकर यांनी शिवाजीनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली आहे. त्यामुळे शहरातील उद्योजक क्षेत्रात एकच खळबळ उडाली होती.

कुटुंबीयांनी केलेल्या तक्रारीनंतर पोलिसांनी शोध सुरु केला होता. तपास सुरू असताना गौतम पाषाणकर यांची सुसाईड नोट आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. सुसाईड नोटमध्ये व्यवसायातील आर्थिक नुकसानामुळे आत्महत्या करत असल्याचं गौतम यांनी लिहिलं आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गौतम यांनी बुधवारी दुपारी लोणी काळभोर येथे भेट दिली होती. त्यानंतर ते दुपारी ४ वाजताच्या सुमारास जंगली महाराज रोडवरील कार्यालयात गेले होते. त्यांच्या ड्रायव्हरने अनेकदा कॉल करण्याचा प्रयत्न केला, पण त्यांचा फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. यानंतर ड्राइव्हरने गौतम यांचा मुलगा कपिल याच्याशी संपर्क साधला, अशी माहिती पोलिसांनी पुढे दिली. कुटुंबीय शोध घेण्यात अपयशी ठरल्यानंतर कपिलने शिवाजीनगर पोलिस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंदविली.

तपास सुरू असताना चालकाकडे दिलेल्या लिफाफ्यात सुसाईट नोट असल्याचं आढळून आले. मागील काही दिवसांपासून व्यवसायात झालेल्या नुकसानामुळे आत्महत्येचं पाऊल उचलत असून कोणालाही जबाबदार ठरवू नये असं त्यांनी त्यात लिहिलं आहे. यानंतर तपासाचा वेग वाढवला असून विद्यापीठ परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे शोध घेत असल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली आहे.

व्यवसायात मोठे नुकसान झाल्यामुळे प्रसिद्ध व्यावसायिक गौतम पाषाणकर हे मोटार चालकाकडे सुसाईड नोट ठेवून बेपत्ता झाले आहेत. बुधवारी सायंकाळी ते शिवाजीनगर भागातून बेपत्ता झाले आहेत. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात बेपत्ता झाल्याची तक्रार नोंद करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button