breaking-newsमनोरंजन

एक व्हिलनच्या सिक्वलसाठी एकता कपूर-करण जोहर एकत्र

एक व्हिलन या चित्रपटात रितेश देशमुखने खलनायकी भूमिका साकारली होती. त्यात त्याने आपल्या अभिनयाने प्रेक्षकांच्या मनात घर केले होते. आता याचा एक व्हिलन या चित्रपटाचा सिक्वल अर्थात दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती समोर आली आहे.

एकता कपूर आणि करण जोहरसोबत मिळून आता एक व्हिलनचा सीक्वल बनवू शकते. सध्या चित्रपटाच्या सीक्वलवर काम सुरु झाल्याचे सांगण्यात येत आहे. हा चित्रपट करण जोहर धर्मा प्रोडक्शनच्या बॅनरखाली बनवणार आहे. चित्रपटाची स्टारकास्ट अजून फायनल केलेली नाही. परंतू सिध्दार्थच्या नावाची चर्चा आहे. चित्रपट पुढच्या वर्षी पडद्यावर येईल. यामध्ये सिध्दार्थसोबत कृती सेनन दिसू शकते. चित्रपटाचे दिग्दर्शन मोहित सूरी करणार आहेत.

दरम्यान, रितेश देशमुखच्या एक व्हिलन चित्रपटाची निर्मिती एकता कपूरने केली होती. चित्रपटाने बॉक्सऑफिसवर १०० कोटींपेक्षा जास्त कमाई केली होती.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button