breaking-newsTOP Newsमुंबई

भारताचे माजी क्रिकेटपटू व यूपीचे मंत्री चेतन चौहान यांचे निधन

मुंबई – भारताचे माजी क्रिकेटपटू चेतन चौहान यांचे निधन झाले आहे. याबाबतची माहिती चेतन चौहान यांचे बंधू पुष्पेंद्र चौहान यांनी दिली आहे. काही दिवसांपुर्वी चेतन चौहान यांना कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारांदरम्यानच त्यांचे निधन झाले आहे.

चेतन यांनी 40 कसोटी सामन्यांमध्ये भारतीय संघाचं प्रतिनिधित्व केलं आहे. सुनील गावस्कर आणि त्यांची जोडी भारताकडून सलामीला येत असे. स्थानिक क्रिकेटमध्ये त्यांनी दिल्ली आणि महाराष्ट्राचं प्रतिनिधित्व केलं. खेळातून बाजूला झाल्यानंतर ते राजकारणात सक्रिय झाले. उत्तर प्रदेशातील अमरोहा मतदारसंघातून भाजपचे उमेदवार म्हणून ते 1991 आणि 1998 मध्ये लोकसभेवर निवडून गेले. मात्र 1996, 1999, 2004 मध्ये त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं.

1981 मध्ये त्यांना अर्जुन पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं. नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजी या संस्थेचे चेअरमन म्हणून त्यांनी जून 2016 ते जून 2017 असं वर्षभर काम पाहिलं. ऑगस्ट 2018 मध्ये उत्तर प्रदेशातील सरकारमध्ये ते युवा आणि क्रीडा खात्याचे मंत्री होते. चेतन यांनी डीडीसीए अर्थात दिल्ली अँड ड्रिस्ट्रिक्ट्स क्रिकेट असोसिएशनमध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष, सचिव तसंच निवड समितीचे प्रमुख अशा विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या. टीम इंडियाचे मॅनेजर म्हणूनही त्यांनी काम पाहिलं होतं.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button