breaking-newsताज्या घडामोडीपुणे
दहशतवादाचा सामना करण्यास ‘मिलेक्स १८ या पहिल्या लष्करी युध्द सराव
पुणे – दहशतवदाविरूद्ध लढण्यासाठी जगातील सर्वच देशांनी एकत्र येणे आवश्यक आहे. दहशतवाद ही समस्या केवळ एका देशापुरती मर्यादित राहिली नसून जगातील बहुतांश राष्ट्रांना या समस्येचा सामना करावा लागत आहे.
याचाच एक भाग म्हणून पुण्यातील औंध येथे बे आफॅ बंगाल इनिशिएटिव्ह फॉर मल्टीसेक्टरल टेक्निकल अॅँण्ड इकॉनॉमिक को-ऑपरेशन (बिम्सटेक) च्या वतीने दहशतवादाचा सामना करण्यासाठी ‘मिलेक्स १८ या पहिल्या लष्करी युध्द सराव घेण्यात येत आहे. या लष्करी सरावात भारत, भूतान, बांग्लादेश, म्यानमार आणि श्रीलंका या राष्ट्रांच्या सैनिकी तुकड्यांचा सहभाग आहे. यामध्ये प्रत्येक राष्ट्राची एक सैन्यतुकडी सहभागी झाली आहे. या तुकडीत पाच वरिष्ठ अधिकारी आणि 25 जवान सहभागी आहेत.