breaking-newsपिंपरी / चिंचवड

पवना धरण 67.80 टक्के भरले

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

गेल्या सहा दिवसांत पडत असलेल्या जोरदार पावसाने पवना धरणात पाण्याची पातळी वाढली आहे. मागील 24 तासात धरणक्षेत्रात पडलेल्या 65 मिलिमीटर पावसाने धरणात 5.15 टक्के पाणीसाठा वाढला आहे. त्यामुळे धरण 67.80 टक्के भरले आहे.

धरणक्षेत्रात 1 जूनपासून आजपर्यंत 1 हजार 85 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तर याच काळात पवना धरणातील पाणीसाठा 32.51 टक्के वाढला आहे. गेल्या 24 तासात 65 मिलिमीटर पाऊस पडला. डोंगराळ भागातून पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात धरणात येते. त्यामुळे मागील 24 तासात पवना धरणाच्या पाणीसाठ्यात 5.15 टक्क्यांनी वाढ झाली आहे. आज धरणात 67.80 टक्के पाणीसाठा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button