breaking-newsराष्ट्रिय

मध्य प्रदेशात फोडाफोडीचे राजकारण?; अन्य पक्षाचे आमदार संपर्कात असल्याचा भाजपाचा दावा

मध्य प्रदेशात काँग्रेसने दमदार कामगिरी करत भाजपाला धक्का दिला असला तरी कोणत्याही पक्षाला बहुमत मिळू शकलेले नाही. त्यामुळे आता अपक्ष, बसपा- सपा या पक्षाच्या आमदारांना महत्त्व प्राप्त झाले असून भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी सूचक विधान केले आहे. अपक्ष आणि अन्य पक्षाचे आमदार भाजपाच्या संपर्कात आहेत, असा दावा त्यांनी केला असून लवकरच राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करु, असे त्यांनी सांगितले.

मध्य प्रदेशमधील मतमोजणी बुधवारी सकाळी संपली असून २३० जागांपैकी काँग्रेसला ११४ जागांवर विजय मिळाला आहे. तर भाजपाला १०९ जागांवर विजय मिळाला आहे. अपक्ष उमेदवार ४ जागांवर निवडून आले असून बहुजन समाज पक्षाला २ आणि समाजवादी पक्षाला एका जागेवर विजय मिळाला आहे. या घडामोडी घडत असताना बुधवारी पहाटेच भाजपाचे प्रदेशाध्यक्ष राकेश सिंह यांनी एक ट्विट केले. ‘देशात काँग्रेसला जनादेश मिळालेला नाही. काही अपक्ष आणि अन्य पक्षाचे आमदार भाजपाच्या संपर्कात आहे. लवकरच आम्ही राज्यपालांची भेट घेऊन सत्तास्थापनेचा दावा करु’, असे ट्विट त्यांनी केले.

Rakesh Singh

@MPRakeshSingh

प्रदेश में कांग्रेस को जनादेश नहीं है ।
कई निर्दलीय और अन्य भाजपा के संपर्क में हैं।
कल राज्यपाल महोदया से मिलेंगे।

१,५४७ लोक याविषयी बोलत आहेत

राकेश सिंह यांच्या या ट्विटमुळे भाजपा देखील सत्तास्थापनेसाठी हालचाली करत असल्याचे स्पष्ट झाले. बुधवारी सकाळी शिवराज सिंह चौहान यांच्या भोपाळमधील भाजपाच्या नेत्यांची एक बैठकही पार पडली. या बैठकीत कैलाश विजयवर्गीय, राकेश सिंह, विनय सहस्त्रबुद्धे आणि नरेंद्रसिंह तोमार हे नेते उपस्थित होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button