breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

भारताकडून K-4 बॉलिस्टिक मिसाईलच परीक्षण, शत्रूला क्षणार्धात करेल ‘उद्धवस्त’ !

नवी दिल्ली | वृत्तसंस्था | भारताने रविवारी संध्याकाळी आंध्रप्रदेशच्या किनार्‍यावरून K-4 बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी केली. हे असे क्षेपणास्त्र आहे जे देशाच्या शत्रूला क्षणार्धात उद्ध्वस्त करू शकते. काही मिनिटात पाकिस्तान आणि चीनमधील शहरांंची राख करण्याची ताकद असणार्‍या या क्षेपणास्त्राचे नाव आहे K-4 SLBM हे एक सबमरीन लॉन्च बॅलेस्टिक मिसाइल आहे. म्हणजेच हे खोल समुद्रातील पाणबुडीवरून सोडले जाऊ शकणारे क्षेपणास्त्र आहे.

K-4 क्षेपणास्त्राला प्रथम स्वदेशी आण्विक पाणबुडी आयएनएस अरिहंतवर लॉन्च करण्यात आले. K-4 चे नाव भारताचे दिवंगत माजी राष्ट्रपती आणि मिसाइल मॅन डॉक्टर ए .पी.जे.अब्दुल कलाम यांच्या नावावरून ठेवण्यात आले आहे. येथे के चा अर्थ कलाम असा आहे. K-4 ची निर्मिती डीआरडीओने ज्या प्रकल्पांतर्गत केली आहे त्याचे नाव ब्लॅक प्रोजेक्ट आहे. हे नाव यामध्ये बाळगल्या जात असलेल्या गोपनीयतेमुळे देण्यात आले आहे. सूत्रांच्या माहितीनुसार K-4 ची चाचणी विशाखापट्टणमवरून 45 नॉटिकल मैल दूर एका अज्ञात स्थळी करण्यात आली. ज्या अरिहंत पाणबुडीवरून K-4 लॉन्च करण्यात आले ती भारताची पहिली स्वदेशी आण्विक पाणबुडी आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button