breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

जामखेडमध्ये खासगी डॉक्टरसह एक जण पॉझिटिव्ह

जामखेड- कोरोना प्रदुर्भावापासून गेल्या काही महिन्यांपासून सुरक्षित असणाऱ्या जामखेड शहरात कोरोनाने पुन्हा शिरकाव केला आहे. जामखेड शहरात एका खासगी डॉक्टरसह दोन जण कोरोना पॉझीटीव्ह आढळून आले आहेत. त्यामुळे शहरात एकच खळबळ उडाली आहे.

शहरातील खासगी हॉस्पिटलमधील एक डॉक्टर हे पुणे येथे आपल्या कुटुंबातील आजारी व्यक्तीला भेटण्यासाठी गेले होते.त्यांनतर ते काही दिवसांनी जामखेडला आले. त्यांना श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्यांनी खासगी लॅब मध्ये कोरोनाची टेस्ट करून घेतली. आज त्यांचा रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. तर बीड रोड येथे राहणाऱ्या एका व्यक्तीचाही कोरोना रिपोर्ट पॉझीटीव्ह आला आहे. ही व्यक्ती अनेकांच्या संपर्कात आल्याने प्रशासनाची डोकेदुखी वाढली आहे. प्रशासनाने बाधितांच्या संपर्कात आलेल्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे. तब्बल तीन महिन्यांच्या विश्रांतीनंतर जामखेड शहरात कोरोनाने एन्ट्री केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button