breaking-newsताज्या घडामोडीमनोरंजन

सुशांत सिंह राजपूतचा ‘दिल बेचारा’ आज OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित

जो आज हयात नसूनही सर्वांच्या मनावर अधिराज्य गाजवतोय तो म्हणजे सुशांत सिंह राजपूत. सुशांतचा शेवटचा चित्रपट ‘दिल बेचारा’ आज OTT प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. त्याच्या चाहत्यांसह बॉलिवूडमधील अनेक कलाकारांमध्ये प्रचंड उत्सुकता आहे. त्यामुळे आज सकाळपासून ट्विटरवर #DilBecharaDay ट्रेंड होत आहे. आज संध्याकाळी 7.30 वाजता हा चित्रपट डिस्नी प्लस हॉटस्टार या ओटीटी प्लेटफॉर्मवर प्रदर्शित होणार आहे. सुशांत सिंहच्या आत्महत्येनंतर बॉलिवूडमधील नेपोटिजम हा मुद्दा जोर धरू लागला आणि सुशांतला न्याय मिळावा अशी जोरदार मागणी संपूर्ण देशभरातून होऊ लागली आहे.

यामुळे सुशांतच्या या शेवटच्या चित्रपटाची सर्वच जण आतुरतेने वाट पाहात आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शक मुकेश छाबड़ा ने आज ट्विटरवर ‘दिल बेचारा डे’ असे लिहिले आहे. त्यामुळे फॅन्सनेही हाच हॅशटॅग पुढे ट्रेंड केला.

त्यासोबत सलमान खानच्या फॅन क्लबनेही लोकांना हा चित्रपट पाहण्याचे अपील केले आहे.आज संध्याकाळी 7.30 वाजता डिज्नी प्लस हॉटस्टारवर हा चित्रपट नि:शुल्क स्ट्रीम केला जाईल. सुशांतसह या चित्रपटात संजना संघी मुख्य भूमिकेत दिसणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button