breaking-newsपिंपरी / चिंचवड

पिंपरी मेट्रो स्टेशन नामकरण ठरावाला महासभेची मान्यता, राजू दुर्गेंचा पाठपुरावा यशश्वी

पिंपरी | महाईन्यूज | प्रतिनिधी

संपूर्ण धनगर समाजासाठी पुजनीय असणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवींचे नाव पिंपरी-चिंचवड शहरातील महापालिकेच्या मुख्य इमारती समोर होत असलेल्या मेट्रो स्टेशनला देण्याचा निर्णय घेण्यात आला. ”पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर मेट्रो स्टेशन पिंपरी” असे नामकरण करण्याच्या ठरवास बुधवारी (दि. 26) पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या मुख्य सभेत मंजुरी देण्यात आली. त्यासाठी माजी नगरसेवक राजी दुर्गे यांनी केलेला पाठपुरावा यशस्वी ठराल्याने त्यांनी पालिका प्रशासन आणि भाजप पदाधिका-यांचे अभार व्यक्त केले आहेत.

माजी नगरसेवक यांनी धनगर समाजाच्या वतीने पालिका प्रशासन, भाजप पदाधिकारी आणि मेट्रो व्यवस्थापनाचे अधिकारी यांच्याकडे नामकरणासाठी पाठपुरावा केला होता. त्यानुसार 1 फेब्रुवारी रोजी महापौर उषा उर्फ माई ढोरे, आयुक्त श्रावण हर्डीकर, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडिगेरी, मेट्रोचे अधिकारी यांची संयुक्त बैठक झाली. बैठकीत राजू दुर्गे यांनी महापौर आणि स्थायी समिती अध्यक्ष यांना पत्र देऊन केलेल्या मागणी प्रमाणे पिंपरीतील या मेट्रो स्टेशनला पुण्यश्लोक अहिल्यादेवी मेट्रो स्टेशन पिंपरी असे नामकरण करण्याबाब चर्चा झाली होती. चर्चेनुसार स्थायी समितीची आणि महापालिकेच्या मुख्य सभेची मान्यता घेऊन सदरचा विषय कायदेशीर पध्दतीने करण्याचा निर्णय घेण्यात आला.

मान्यवरांचा धनगर समाजाच्या वतीने सत्कार

पिंपरी-चिंचवड शहरातील धनगर समाजाच्या शिरपेचात मनाचे पाण खोवणारा हा निर्णय अत्यंत प्रेरणादायी आहे. हा निर्णय समाजाचे नेते, पिंपरी चिंचवड शहर धनगर समाज महासंघाचे अध्यक्ष माजी नगरसेवक राजू दुर्गे यांच्या पाठपुराव्याने मार्गी लागला आहे. हा निर्णय करण्यासाठी भाजप शहर अध्यक्ष आमदार महेश लांडगे, आमदार लक्ष्मण जगताप, महापौर उषा उर्फ माई ढोरे, स्थायी समिती अध्यक्ष विलास मडेगिरी, सत्तारुढ पक्षनेते नामदेव ढाके, आयुक्त श्रावण हार्डीकर आणि सभागृहातील सगळे सर्वपक्षीय नगरसेवक यांनी सगळ्यांनी अत्यंत मोलाचे सहकार्य केले आहे. त्यामुळे धनगर समाजाच्या वतीने दुर्गे यांनी सर्वांचे अभार मानले आहे. येत्या रविवारी सर्व मान्यवरांचा धनगर समाजाच्या वतीने सत्काराचा कार्यक्रम घेण्यात येणार आहे, अशी माहिती दुर्गे यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button