breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भाजप आमदारांच्या ‘आर्शिवादा’ने स्थापत्य कामात ‘रिंग’

राष्ट्रवादी नगरसेवक मयुर कलाटे यांचा आरोप

पिंपरी ( महा ई न्यूज ) – पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या स्थापत्य विभागाकडून प्रभाग क्रमांक 26 मधील कामे ठेकेदारांना वाटून घेतली आहेत. ही कामे अधिकारी व ठेकेदारांच्या संगणमताने जादा दराने निविदा भरुन पालिकेच्या तिजोरीवर डल्ला मारला जात आहे. ही कामे भाजप आमदारांच्या सांगण्यावरुन झाली असून त्या कामात रिंग झाल्याचा आरोप राष्ट्रवादी नगरसेवक मयुर कलाटे यांनी केला. 

महापालिका आयुक्त श्रावण हर्डिकर यांना पत्र दिले आहे. महापालिका स्थापत्य विभागामार्फत प्रभाग क्रमांक 26 मधील कामासाठी निविदा भरण्यात आलेल्या आहेत. या कामामध्ये रिंग झाली असून सर्व कामे कंत्राटदारांनी रिंग करुन कामे वाटून घेतली आहे. त्यामध्ये काळेवाडी फाटा ते छत्रपती चाैकापर्यंतचा रस्ता सिमेंट कॅाक्रींटचा करणे ( 9 कोटी 59 लाख 37 हजार 969), कावेरी चाैक सब-वे ते पिक सिटीपर्यंत सिमेंट रस्ता करणे ( 24 कोटी 48 लाख 43 हजार 847), वाकड-पिंपळे निलख मधील अंतर्गत रस्ते काॅक्रीटीकरण करणे ( 16 कोटी 64 लाख 90 हजार 190), कस्पटेवस्ती स्मशानभूमी येथे गॅबियन वाॅल बांधणे ( 2 कोटी 49 लाख) या कामात रिंग झाली आहे.

या कामामुळे महापालिकेच्या करदात्या नागरिकाचे नुकसान होत आहे. अनेक कामात ठेकेदार निविदा भरत असून दुस-या ठेकेदारांना निविदा भरुन दिल्या जात नाहीत. या प्रकरणी तात्काळ लक्ष घालून या कामाची नव्याने फेरनिविदा काढण्यात यावी, वरील ठेकेदारांना काळ्या यादीत टाकावे, तसेच संबंधित अधिका-यावर कारवाई करावी, अशी मागणी कलाटे यांनी केली.  

 

    

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button