breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

बस खरेदीसाठी ना हरकत दाखला द्या; महापौरांची पीएमपीएमएलकडे मागणी

पिंपरी, (महा-ई-न्यूज) – कोट्यवधी रुपये खर्चून धुळखात पडलेला बीआरटी मार्ग सुरू करण्यासाठी बसेस खरेदी करण्यात येणार आहे. त्यासाठी 20 बसेस खरेदीसाठी पीएमपीएमएल व्यवस्थापनाने ना हरकत दाखला द्यावा, अशी मागणी महापौर राहूल जाधव यांनी पीएमपीएमएल व्यवस्थापनाकडे केली आहे.

महापौर जाधव यांनी पुणे महानगर परिवहन महामंडळाच्या अध्यक्षा नयना गुंडे यांना पत्र पाठविले आहे. त्यात म्हटले आहे की, महापालिकेतील संचालक मंडळातील सभासदांना विश्वासात न घेता पीएमपी प्रशासन परस्पर निर्णय घेत आहे. गैरव्यवहाराचे आरोप असलेल्या अधिका-यांना पदोन्नती दिली जाते. बसेसची संख्या अपुरी असल्याने महापालिकेने 400 बसेस खरेदीचा विषय मंजुर केला आहे. 40 टक्के हिस्साप्रमाणे शहराला 180 बस मिळणार आहेत. मात्र, सद्यस्थितीत शहरातील काळेवाडी फाटा ते देहू आळंदी रस्ता आणि बोपखेल ते आळंदी हे बीआरटीचे दोन मार्ग तयार आहेत.

परंतु, बस नसल्यामुळे ते मार्ग सुरु झाले नाहीत. या बीआरटी मार्गावर बस सोडण्यास महामंडळ असमर्थ असल्याचे सांगितले आहे. त्यामुळे या मार्गासाठी 20 बसेस खरेदी करण्यासाठी महापालिकेला ना हरकत प्रमाणपत्र द्यावे, अशी मागणी महापौर जाधव यांनी निवेदनातून केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button