breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

भाजपचे आमदार संजय सावकारे यांना करोनाची लागण

जळगाव – भुसावळ विधानसभेचे भाजपचे आमदार संजय सावकारे यांनी तपासणी केल्यानतंर त्यांचा करोना अहवाल पाझिटिव्ह आला आहे. सावकारे हे उपचारासाठी डॉ. उल्हास पाटील कोविड रुग्णालयात दाखल झाले आहेत. संपर्कात आलेल्यांना चाचणी करून घेण्याचे आवाहन त्यांनी केले आहे.


भुसावळ येथील नगरपालिकेचे नगराध्यक्ष रमण भोळे यांना करोनाचा बाधा झाली होती. त्यांच्यापाठोपाठ आता आमदार संजय सावकारे यांचा देखील करोना चाचणीचा अहवाल पाझिटिव्ह आला आहे. राज्याचे पावसाळी अधिवेशन आटोपून घरी परतल्यानतंर सावकारे यांनी अँटीजन टेस्ट केली होती. त्यांचा अहवाल पाझिटिव्ह आल्यानतंर सावकारे हे उपचारासाठी गोदावरी फाऊंडेशनच्या डॉ. उल्हास पाटील कोविड रुग्णालयात दाखल झाले आहेत.

आपल्या संपर्कात आलेल्यांनी चाचणी करून घ्यावी. तसंच, घाबरून जाण्याचे कारण नाही .करोनावर निश्चितपणे मात करता येते, असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button