breaking-newsताज्या घडामोडीलेख

Mahashivratri : भगवान शंकराने धारण केलेल्या चिन्हांचा अर्थ काय ?

महा ई न्यूज | प्रतिनिधी | मयुरी सर्जेराव |

वैष्णव संप्रदायानुसार सूर्योदयाच्या तारखेप्रमाणे या वर्षी 21 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री साजरी केली जाणार आहे.शिवरात्रीला शंकराला प्रसन्न करण्यासाठी रुद्राभिषेक केला जातो.शिवरात्रीला सकाळपासूनच ॐ नम: शिवायचा मंत्रजाप केला जातो.शिवलिंगावर मध, पाणी आणि दुधाने अभिषेक केलं जात. बेलाचे पान, बेलफळ, धोत्रा, फळ आणि फुले शंकराला वाहिलं जातं…तर शंकरांची महाशिवरात्री को साजरी केली जाते आणि त्याची महती सांगणारी कथाही आपण महाशिवरात्रीच्या निमित्तानं लिहिलेल्या पहिल्या लेखात पाहिली… तर या लेखात आपण भगवान शंकरानं धारण केलेल्या चिन्हांचा अर्थ जाणून घेण्याचा प्रयत्न करुया…

भगवान शंकराकडे पाहिलं तर त्यांनी अनेक चिन्हे धारण केलेले दिसतात…जसं की, शंकराने डोक्यावर धारण केलेली चंद्रकोर, त्यांच्या हातातलं डमरू, त्यांच्या गळ्या भोवती असलेला साप, त्यांच्या हातात असलेलं त्रिशूल, शंकराच्या जटांमधून वाहणारी गंगा, भगवंताचा तिसरा डोळा अशा अनेक गोष्टी…

1… शंकराने डोक्यावर धारण केलेली चंद्रकोर

चंद्र मनाचे द्योतक आहे आणि मनाचे अस्तित्व संपणे म्हणजे शिव तत्व. काहीही समजून घेण्यासाठी, अनुभवण्यासाठी तसेच व्यक्त करण्यासाठी मनाची गरज असते.निर्मनावस्था, अनंत चेतना अनुभवण्यासाठी देखील अल्पशा प्रमाणात मनाची गरज आहे. अव्यक्ताच्या अनुभूतीसाठी लागणाऱ्या त्या अल्प मनाचे प्रतिक भगवान शंकराच्या माथ्यावरील छोटीशी चंद्रकोर आहे.तसेच शिवशंकर म्हणजे दोन रुप एक अग्नी सारख आणि एक शांत ,ध्यानास्थ..चंद्र हा देखील शांतेतच प्रतिक मानला जातो…त्यामुळे शांतताप्रिय वृत्ती म्हणून शंकरांनं चंद्राची कोर हा अलंकार धारण केल्याचं म्हटलं जातं…

2…शंकराच्या डमरूचे महत्त्व

डमरू हा विश्वाचे प्रतिक आहे जेथे सतत निर्मिती लय आणि पुन्हा निर्मिती सुरु आहे. ही निर्मितीची प्रक्रिया आहे.डमरू हे संगिताचं प्रतिक आहे..भगवान शंकरही नृत्य आणि संगिताचे द्व मानले जातात॥..डमरूच्या आवाजात एक प्रकारची लय असते …तीच लय आपल्या हृदयाच्या ठोक्यात आणि संपूर्ण विश्वात असते… डमरूच्या आवाजाने ऊर्जा निर्माण होते ..डमरू उर्जेचंही प्रतिक आहे. डमरूच्या लयबद्ध आवाजाने आजूबाजूची नकारात्मक शक्ती दूर होते असं म्हटलं जात..डमरूच्या आवाजाचा वैज्ञानिकांनीही अभ्यास केला आहे…डमरूच्या आवाजाने आजूबाजूला एक सकारात्मक कंपण तायर होते…भगवान शंकर जेव्हा खधी खुश व्हायचे तेव्हा ते डमरू वाजवायचे असं म्हटलं जायच…

3…भगवान शंकराच्या गळ्यातील सापाचे महत्व

निव्वळ चेतनेची पोकळी असणे, कोणतीही कृती नसून केवळ सजगता असणारी अवस्था म्हणजेच शिव, म्हणजेच समाधी अवस्था. या अवस्थेची ओळख व्हावी म्हणून शंकराच्या गळ्याभोवती साप आहे. साप हा या सजगतेचे प्रतिक आहे.त्याच प्रमाणे शंकरांच्या गळ्याभवती पाहिल तर सापाचे तीन वेटोळे असतात..तिन वेटोळे म्हणजे वर्तमान,भुतकाळ आणी भविष्यकाळ दर्शवतात…त्यांचा नियंत्रकही भगवान शिव आहे असं म्हटलं जात…

4…भगवान शंकराच्या त्रिशूलचे महत्व

त्रिशूल चेतनेच्या तीन स्थिती दर्शवतो: जागृत, स्वप्न आणि निद्रावस्था. तसेच ते सत्व, रजस आणि तमस गुणांचे प्रतिक आहे. शंकराने त्रिशूल धारण करण म्हणजे तो या तिन्ही जागृती, स्वप्न आणि निद्रावस्थेपेक्षा श्रेष्ठ असून या तिन्ही अवस्था त्याने धारण केल्या आहेत.शूल म्हणजे समस्या, दुःख. त्रिशूल म्हणजे सर्व प्रकारच्या समस्या, दुःखांचे निराकरण…जीवनात तीन यातना आहेत.आधिभौतिक(शारीरिक),अध्यात्मिक,आणि आदिदैविक…या सर्वांतून मुक्त करणारे म्हणजे त्रिशूल जे शंकराने आपल्या हातात धारण केले आहे.

5…भगवान शंकराच्या मस्तकावरून वाहणाऱ्या गंगेचं महत्व

गंगा म्हणजे ज्ञान जे तुमच्या आत्म्याला शुद्ध करते. मस्तक हे ज्ञानाचे प्रतिक आहे आणि हृदय प्रेमाचे प्रतिक आहे.गंगा प्रेमाचे प्रतिक असती तर ती भगवान शंकराच्या हृदयातून निघाली असती. परंतु ती मस्तकावरून, जटेतून निघाली आहे, म्हणजेच ती निव्वळ ज्ञानाचं प्रतिक आहे.ज्ञान हे मुक्त, स्वतंत्र आणि शुद्ध करणारे असते. ही ज्ञानाची वैशिष्टे आहेत. ज्ञान हे प्रवाही असते. म्हणून ज्ञान हे एकाच जागी न साठता त्याचा प्रचार होण गरजेच आहे ..हाच बोध या शंकराच्या जटेतील गंगेतून मिळतो…

6…भगवान शंकराच्या तिसऱ्या डोळ्याचे महत्व

तिसरा डोळा दक्षता आणि सजगतेची निशाणी आहे.

7…भगवान शंकराला निलकंठ का म्हणतात ?

निळा रंग आकाशाचे द्योतक आहे. आकाश सर्वव्याप्त, अनंत असून असीम असते. निराकार आहे. शिव तत्वाला देखील आकार नाही, ती कोणी व्यक्ती नाही. त्या अथांग, अनंत, अनाकलनीय ईश्वरी तत्वाला लोकांना आकलनीय करण्यासाठी प्राचीन ऋषींनी हा आकार दिला आहे.ज्ञान देखील निराकार असून ते विश्वातील अणू रेणूमध्ये प्रसवत असते.शिव तत्व म्हणजे समस्त विश्व भरून उरले आहे.

8…शिव लिंगाचे महत्व

लिंग म्हणजे ओळख. सत्य, वस्तुस्थिती जाणून घेण्याचे प्रतिक. जे दिसू शकत नाही मात्र ज्याच्यामुळे आपण बाकीच्यांना ओळखू शकतो ते म्हणजे लिंग. एक बाळ जन्माला येते, ते मुलगा आहे कि मुलगी, हे कसे कळते? शरीराच्या निव्वळ एका अवयवामुळे ते शरीर मुलाचे आहे कि मुलीचे ते कळते. त्या जननेन्द्रीयाला देखील लिंगम म्हणतात.तद्वत, आपण निर्मितीच्या ईश्वराला कसे ओळखणार? तो तर आकारहीन, निराकार आहे. मग त्याला ओळखण्यासाठी काहीतरी प्रतिक हवे नां? असे एकच प्रतिक ज्यामुळे पुरुष आणि स्त्री दोन्ही ओळखले जाईल, समस्त ब्रम्हांडाला सर्वव्यापी परंतु निराकार ईश्वराला जाणण्याचे प्रतिक शिवलिंग होय.शिवलिंगाद्वारे आपण साकाराकडून निराकाराकडे जातो. विश्व आणि विश्वनिर्माता हे एकच आहेत यांचे ते द्योतक आहे.

9…भगवान शंकरापुढे ‘नंदी’ का असतो ?

पूर्वीपासून सर्वत्र बैल, नंदी सदाचरणी, धर्माचे प्रतिक म्हणून सुपरिचित आहे. भगवान शिवाचे वाहन नंदी आहे याचा मतितार्थ हाच आहे की, जेंव्हा तुम्ही सदाचरणी, सत्याचरणी असता ती अनंत आणि भोळी भाबडी चेतना आपल्या सोबत असते.

10…शिवाचे भस्म

‘भ’ म्हणजे ‘भर्त्सनम्’ (नाश होणे) आणि ‘स्म’ म्हणजे ‘स्मरणम्’ (स्मरण करणे) थोडक्यात ज्यामुळे आमची पापे नाश पावतात आणि आम्हाला ईश्वराचे स्मरण होते, ते भस्म ! भस्मातील ‘भ’ म्हणजे सगळ्या पापांची निंदा करण्याचे द्योतक आहे, तर ‘स्म’ यातून शिवाच्या स्मरणाची आठवण होते. भस्म आपल्याला ‘हे शरीर नश्वर आहे आणि एक दिवस त्याचीही राख होणार आहे; म्हणून आपण देहाची आसक्ती बाळगता कामा नये’, याची आठवण करून देते…तर, भस्म आपल्याला ‘हे शरीर नश्वर आहे आणि एक दिवस त्याचीही राख होणार आहे; म्हणून आपण देहाची आसक्ती बाळगता कामा नये’, याची आठवण म्हणजे भस्माची शिकवण आहे…भस्म हे टीळा म्हणून लावण्याचे अनेक महत्त्वाचे फायदे आहेत… आपल्या शरीरातील दोन भुवयांच्या मधील भाग हा शरीरातील सर्व नसांना जोडणारा बिंदू आहे असे मानन्यात येते.त्यामुळे त्या भागावर मसाज केल्यामुळे डोकेदुखी कमी होते असा देखील समज आहे.दोन भुवयांच्या मधील भागावर भस्म अथवा विभूती लावल्याने कडक उन्हाळ्यामुळे होणारी डोकेदुखी कमी होते… भस्म अथवा राखेचा आयुर्वेदिक औषध म्हणून देखील वापर करण्यात येतो.भस्म अथवा विभूती लावल्यामुळे शरीरातील अतिरिक्त आद्रता शोषून घेतली जाते व सर्दीपासून देखील संरक्षण होते.

11…शिव तांडव

समस्त ब्रम्हांड हे विशाल चेतनेचे, शिव तत्वाचे नृत्य आहे. त्या विशाल चेतनेच्या नृत्यातून ती लाखो करोडो सजीवांमध्ये प्रकट झाली. ही अनंत निर्मिती म्हणजे शिवाचे तांडवच आहे, हे विश्व शिवाचे स्थानच आहे.

12…भगवान शंकराचे निवास स्थान – कैलाश

शिवाचे निवास स्थान कैलास पर्वत आणि स्मशान आहे. “कैलास” म्हणजे जिथे निव्वळ उत्सव असतो, आणि “स्मशान” म्हणजे जिथे रिक्तपणा आहे. दिव्यत्व रिक्तपणा तसेच उत्सव असेल तेथेच पहायला मिळते. रिक्तपणा आणि उत्सव आपल्या प्रत्येकामध्ये आहे.

15…‘ॐ नमः शिवाय’ जपाचे महत्व

‘ॐ नमः शिवाय’ अत्यंत परिणामकारक मंत्र आहे. तो तुमच्या अंतर्गत ऊर्जा निर्माण करतो तसेच वातावरण शुद्धीचे कार्य करतो. मंत्रांमध्ये असे ध्वनी असतात जे आपली चेतना ऊर्ध्वगतीला नेतात…ॐ नमः शिवाय – हे शब्द खूप महत्वाचे आहेत कारण ‘न’,’म’,’शि’,’वा’,’य’ हे शब्द पृथ्वी, जल, अग्नी, वायू आणि आकाश या पंच महाभूतांचे प्रतिक आहेत…‘ॐ’ हा या ब्रम्हांडाचा ध्वनी आहे…‘ॐ’ म्हणजे शांती आणि प्रेम.म्हणून जेंव्हा या पंच महाभूतांमध्ये शांती, प्रेम आणि सुसंवाद असतो तेथे आनंद, परमानंद असतो.मंत्रांची शक्ती ग्रहांपेक्षा श्रेष्ठ आहे. ग्रहांचे विपरीत परिणाम ‘ॐ नमः शिवाय’च्या जपाने नष्ट करू शकता.

तर, भगवान शंकर यांनी धारण केलेल्या किंवा त्यांच्या जवळ असलेल्या सर्व चिन्हांचा अर्थ मानला जातो…तसे तर या चिन्हांचे या व्यतिरिक्तही अनेक अर्थ निघतात…पण त्यातले सर्वांत जास्त मानले जाणारे हे महत्त्वाचे अर्थ आहेत…

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button