breaking-newsताज्या घडामोडीमुंबई

Novavax ची सीरम इन्स्टिट्यूटसोबत कोविड 19 ची लस उत्पादन कराराची घोषणा

मुंबई – Novavax कंपनीने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियासोबत कोविड 19 लस उत्पादन करार जाहीर केला आहे. Novavax ने प्रसिद्ध केलेल्या प्रसिद्धी पत्रकात म्हटलं आहे की, सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडिया 2021 मध्ये NVX-COV 2373 चे एक अब्ज डोस तयार करणार आहे.

ऑगस्टमध्ये Novavax ने सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाशी करार केला आहे. Novavax ने जगातील सर्वात मोठ्या लस उत्पादक सीरम संस्थेबरोबर एक अब्ज डोस तयार करण्यासाठी करारावर स्वाक्षरी केली आहे. आता विस्तारीत कराराच्या दृष्टीने सीरम इन्स्टिट्यूट या लशीतील अँटिजन घटक तयार करेल.

अमेरिकन कंपनी Novavax लसीची चाचणी मधल्या टप्प्यात आहे. प्राथमिक टप्प्याच्या चाचणीनंतर असे आढळले की त्यात कोरोना व्हायरस विरुद्ध मोठ्या प्रमाणात अँटिबॉडी तयार झाल्या आहेत. त्यामुळे ही लस येत्या काळात कोरोनासाऱख्या साथीवर मात करण्यासाठी महत्त्वाची ठरु शकते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button