breaking-newsताज्या घडामोडीपुणे

भरदिवसा दिवाणजींला लुटणा-या तिघांना पोलिसांकडून अटक

पुणे – व्यवसायाची रोकड बॅंकेत जमा करण्यासाठी निघालेल्या दिवाणजीवर भर रस्त्यात रॉडने हल्ला करत लुटणाऱ्या तिघांना गुन्हे शाखेच्या खंडणी व अमली पदार्थ विरोधी पथकाने 24 तासाच्या आत जेरबंद केले आहे. आरोपींच्या ताब्यातून चोरी केलेली रोकड व दुचाकी असा, 3 लाख 63 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

थापा उर्फ विकास गोविंद कांबळे( लोहियानगर), मयुर सुरेश जाधव ( रा. जनता वसाहत), अक्षय रमेश नवले ( रा जनता वसाहत) अशी अटक करण्यात आलेल्या तिघांची नावे आहेत. यातील कांबळे आणि नवले हे दोघे सराईत गुन्हेगार आहेत. त्यांना पुढील तपासासाठी मार्केट यार्ड पोलिसांच्या ताब्यात देण्यात आले आहे.

याबाबत तेलाचे व्यापारी नहार यांच्याकडे दिवाणजी म्हणून नोकरीस असलेल्या सुमंतीलाल चंदनलाल ओस्तवाल (69, रा. गंगानगर, आकुर्डी प्राधिकरण) यांनी फिर्याद दिली होती.

गुन्ह्याच्या तपास करत असताना,सीसीटीव्ही फुटेज व तांत्रिक विश्‍लेषणाच्या आधारे आरोपींची ओळख पटवण्यात आली. पोलिस कर्मचारी रमेश चौधर यांना तिघे आरोपी रामटेकडी परिसरात असल्याची माहिती मिळाली त्यानुसार, वरिष्ठ निरीक्षक राजेंद्र मोहिते यांच्या सुचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक दत्ताजी मोहिते, हवालदार उदय काळभोर,चिखले, गरुड, येलपल्ले यांनी सापळा रचून तिघांना अटक केली. ही कामगिरी अपर पोलिस आयुक्त अशोक मोराळे, उपायुक्त बच्चन सिंह यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button