breaking-newsताज्या घडामोडीपुणे

लोणावळ्यात भुशी धरणावर मजा घेण्यासाठी गेलेल्या पर्यटकांवर गुन्हे दाखलं…

सध्या महाराष्ट्रात कोरोनाचा धोका वाढताना पहायला मिळत आहे… इकत्या गंभीर परिस्थितीत आणि तेही आता कुठेही फिरायला बंदी असतानाही काही पर्यटक जीव धोक्यात घालून आणि या परिस्थितीला गांभिर्याने न घेता लोणावळ्यात फिरण्यासाठी येत आहेत. अशातच भुशी धरणावर मजा घेण्य़ासाठी नेहमीप्रमाणे पर्यटक लोणावळ्यात पोहोचले. पण याची दखलं घेत पोलिसांनी त्यांच्यावर गुन्हे दाखल केले आहेत…

कोरोनाचं संकट आणि लॉकडाऊन असताना लोणावळ्यात सहलीसाठी येणं पर्यटकांना महागात पडलं आहे. असा निष्काळजीपणा करणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाई केली आहे. विनापास आलेल्या 131 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बंदी झुगारल्याप्रकरणी 51 गुन्ह्यांची नोंद झाली आहे. याशिवाय विनामास्क आलेल्या 129 पर्यटकांकडून तब्बल 64 हजार 500 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

अशा परिस्थितीत कोणीही स्वत:चा जीव धोक्यात घालून कुठेही फिरण्यासाठी किंवा सहलीसाठी जाऊ नय़े …यामुळे स्वत:हा सोबत ईतरांचाही जीव आपण धोक्यात घातल असतो हे सर्वांनी लक्षात घ्यावं…

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button