breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

एसटी चालकाचा हृदयविकाराच्या झटक्याने मत्यू ; कामगारांचा ‘हा’ आरोप

मंडणगड |

रत्नागिरी जिल्हयातील मंडणगड आगाराचे चालक देविदास विठ्ठल कांबळे (वय ४०) यांचा हृदयविकाराच्या झटक्याने मृत्यू झाल्याची दुर्देवी घटना घडली आहे. त्यांनी सुमारे १० वर्षे एसटी महामंडळात सेवा बजावली होती. मानसिक ताणतणावाने त्यांचा मृत्यू झाल्याचे सांगितले जात आहे. त्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त होतेय. मूळचे लातूर जिल्हयातील औसा तालुक्यातील असलेले कांबळे आणि त्यांचे कुटुंब गेले दहा वर्षे कोकणात मंडणगड येथे बोरीचा माळ येथील बैकर चाळीत वास्तव्यास होते.

आंदोलक एसटी कर्मचाऱ्यांवर कुठल्याही प्रकारची कारवाई करायची नाही आणि हजर करून घेण्याचे किंवा अर्ज करण्याची गरज नाही असे आदेश न्यायालयाने दिले असताना एसटी महामंडळाने आणि महाविकास आघाडी सरकारने परिपत्रक काढून कारवाई करण्याचे जाहीर केले आहे. तसेच कांबळे यांना पाच महिन्यांचा पगारही मिळणार नव्हता. तशातच ते आर्थिक विवंचनेत होते. पुढेही याच जाचक अटी नियम आपल्या आयुष्यात अशाच कायम रहातील म्हणून त्यांच्यावर मानसिक दडपण आले होते. याच कारणामुळे त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचा आरोप कामगार संघटनांकडून करण्यात आला आहे. ही माहिती देताना आमच्यावर कारवाई होण्याची शक्यता असल्याने आमची नावे गुप्त ठेवा अशी विनंतीही या पदाधिकाऱ्यांनी केली आहे.

देविदास विठ्ठल कांबळे यांच्या पश्चात आई, वडील, भाऊ, पत्नी, तीन मुली असा परिवार आहे. मंडणगड एसटी आगारातील काही कर्मचारी व मंडणगड येथील दानशूर व्यक्तींनी आर्थिक मदतीचा हात पुढे करत शववाहिनीची व्यवस्था केली. त्यानंतर देवीदास कांबळे यांचा मृतदेह कुटुंबासह काही कर्मचारी गावी घेऊन गेले. दरम्यान, या घटनेनंतर एसटी कर्मचाऱ्यांकडून शोक व्यक्त करण्यात आला असून कर्मचाऱ्यांच्या चेहऱ्यावर या सगळ्या घटनेची चिंता स्पष्टपणे जाणवत होती.

  • कसे फेडेल ठाकरे सरकार हे पाप?- भाजपचे श्रीराम ईदाते यांचा सवाल

हे ठाकरे सरकार असे एसटी कर्मचाऱ्यांचे आणखी किती निष्पाप जीव घेऊन शांत बसणार आहे? असा संतप्त सवाल भाजपचे भटके विमुक्त विभागाचे कोकण संयोजक श्रीराम ईदाते यानी केला आहे. हे सरकार निष्पाप जीवांचा बळी घेत असून त्यांच्या कुटुंबीयांचा शाप हे सरकार कुठे फेडणार, असा संतप्त सवाल त्यांनी केला आहे. या सरकारला लवकरच सुबुद्धी येवो आणि कर्मचाऱ्यांवर गेले कित्येक दिवस सुरू असलेली सुडाची कारवाई तात्काळ थांबवावी, अी मागणी श्रीराम ईदाते यांनी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button