breaking-newsआंतरराष्टीय

स्वीडनमधील गोळीबारात 3 ठार

कोपनहेगन (डेन्मार्क) – स्वीडनमधील तिसऱ्या क्रमांकाचे मोठे शहर माल्मोमध्ये दोन टोळ्यांमधील वादातून झालेल्या गोळीबाराच्या एका घटनेमध्ये तिघेजण ठार झाले आहेत. या गोळीबारात मरण पावलेले तिघेही 19,27 आणि 29 वर्षांचे तरुण आहेत. यापैकी एकाचीही ओळख पटू शकलेली नाही. याशिवाय अन्य तिघेजण जखमी झाले आहेत. त्यातील एक जण गंभीर जखमी आहे असे प्रादेशिक आरोग्य अधिकाऱ्यांनी सांगितले.

स्वीडनमध्ये गुन्हेगारी टोळ्यांमध्ये भूभागावरील ताबा सिद्ध करण्यासाठी अशा गॅंगवॉरच्या घटना अधूनमधून होत असतात. माल्मा शहरातच तीन ते चार गॅंगवॉरच्या घटना घडल्या आहेत. सोमवारी झालेल्या गोळीबारामागे कोणतेही ठोस कारण नव्हते. केवळ पैसा, मुली आणि गॅंगचे वर्चस्व सिद्ध करण्यासाठीच हा गोळीबार झाला होता.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button