breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन डिजीटल पास मिळवून देणा-यांना अटक

पुणे – बनावट वैद्यकीय प्रमाणपत्र देऊन पुणे पोलिसांचा डिजीटल पास मिळवून देणाऱ्या तीघांना वारजे पोलिसांनी अटक केली आहे. त्यांचे सायबर कॅफे आणि झेरॉक्‍सचे दुकान आहे. लॉक डाऊनमध्ये प्रवासासाठी डिजीटल पास बंधणकारक आहे. या पाससाठी वैद्यकीय प्रमाणपत्राची आवश्‍यकता असते. ही बाब लक्षात घेऊन आरोपींनी हा धंदा सुरु केला होता. कोरोना विषाणूचा धोका वाढत असताना नागरिकांचे आरोग्य धोक्‍यात आणले म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजिंक्‍य जगदिश पाटील (24,सेनापती बापट रस्ता), पवन शदर शिंपी( 19), कुणाल संतोष सावंत अशी अटक आरोपींची नावे आहेत.

कोरोना विषाणूचा उद्रेक वाढल्यावर 23 मार्च रोजी देशभरात लॉक डाऊन जाहीर करण्यात आले होते. सुरवातीला अत्यावश्‍यक सेवा वगळता कोणालाही प्रवासाची मुभा नव्हती. यानंतर प्रत्येक राज्य सरकारने लॉक डाऊनची नियमावली वेगवेगळी जाहीर केली. महाराष्ट्र सरकारच्या नियमावलीनूसार वैद्यकीय किंवा इतर अति महत्वाच्या कामासाठी डिजीटल पास बंधणकारक करण्यात आला. हा पास महाराष्ट्र पोलिसांच्या वेबसाईटवर उपलब्ध करुन देण्यात आला आहे.

यासाठी वैद्यकीय प्रमाणपत्र बंधणकारक करण्यात आले आहे. सध्याही लॉक डाऊन जवळपास शिथील झाले असले तरी शहराबाहेरील/जिल्हयांतर्गत/ दुसऱ्या जिल्हयात प्रवासासाठी डिजीटल पास आवश्‍यक आहे. ही बाब हेरुन आरोपींनी रितसर पैसे घेऊन पास देण्याचा व्यवसाय सुरु केला होता. त्यांनी स्व:तच्या अतुलनगर येथील ओम श्री साई सायबर कॅफेत हा व्यवसाय सुरु केला. यासाठी लागणारे वैद्यकीय प्रमाणपत्रही ते बनावट बनवून देत होते. हे प्रमाणपत्र जोडून पोलिसांच्या वेबसाईटवर नागरिकांचा अर्ज भरुन दिला जात होता. वारजे पोलिसांना माहिती मिळताच पोलिस नाईक अमोल पायगुडे यांनी फिर्याद दाखल केली. याप्रकरणाचा तपास सहायक पोलिस निरीक्षक शेवते करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button