breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

भक्तीभाव : विघ्नहर्त्या लाडक्या बाप्पांचे वाजतगाजत आगमन

पिंपरी – राज्यभरासह पिंपरी-चिंचवडमध्येही आंनदाचे व जल्लोषाचे वातावरण आहे. कारण सगळ्यांचाच लाडका असलेल्या गणपती बाप्पाचं आज गुरूवारी (दि. 13) वाजतगाजत आगमन झाले आहे. ‘गणपत्ती बाप्पा मोरया’चा जयघोष करीत आज घरोघरी आणि शहराच्या विविध भागातील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी गणपतीची प्रतिष्ठापना केली.

 

पुण्यातील श्री कसबा गणपती मंडळ, श्री तांबडी जोगेश्वरी मंडळ, श्री गुरुजी तालीम मंडळ, श्री तुळशी बाग मंडळ व केसरीवाडा गणेशोत्सव या मानाच्या पाचही गणपतींची प्राणप्रतिष्ठा दुपारी बारापर्यंत करण्यात आली. घरातील गणपतीच्या पूजेसाठी, तसेच सजावटीसाठी लागणाऱ्या साहित्याची खरेदी करण्यासाठी लोकांची दिवसभर सर्वत्र गर्दी सुरू होती. विशेषत: दिव्यांच्या माळा, थर्माकॉलची मखर, तोरणे, तसेच अन्य सजावटीचे साहित्य खरेदी करण्यासाठी लोकांनी गर्दी केली होती.

 

काहींनी सकाळी दहा आणि दुपारी बाराच्या आत बाप्पांच्या मुर्तीचे पूजन केले. पुजेसाठी मोदक, फुलांच्या माळा यांसह पुजेच्या साहित्याची अगोदरच तयारी केली होती. गणपतीच्या मुर्ती बाजारपेठेतून घरापर्यंत वाजत गाजत नेण्यात आल्या. तर, काही मंडळांच्या व घरगुती गणपतीचे पूजन सायंकाळी करण्यात आले. एकूणच सर्वत्र मंगलमय वातावरण होते. बालक, ज्येष्ठ व तरुण मंडळींनी बाप्पांच्या आगमणाची तयारी आपापल्या सांस्कृतीक परंपरेनुसार केली होती.

 

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button