breaking-newsमहाराष्ट्र

ब्राह्मोस क्षेपणास्त्राची माहिती लीक, ISIच्या संशयित एजंटला नागपूरमधून अटक

उत्तर प्रदेशच्या दहशतवाद विरोधी पथकाने (एटीएस) नागपूरमध्ये मोठी कारवाई केली आहे. नागपूर येथील डीआरडीओच्या यूनिटमधून पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआयच्या एजंटला अटक केली आहे. निशांत अग्रवाल असे संशयित गुप्तहेराचे नाव आहे. अग्रवालने आयएसआयला संवेदनशील माहिती पुरवल्याचा संशय आहे. तो ब्राह्मोस क्षेपणास्त्र निर्मिती विभागात काम करत होता. महाराष्ट्र आणि उत्तर प्रदेश एटीएसने संयुक्त कारवाई करत ही अटक केली.

निशांत अग्रवाल असे संशयिताचे नाव असून तो मागील ४ वर्षांपासून नागपूर येथील डीआरडीओच्या यूनिटमध्ये कार्यरत आहे. डीआरडीओचे हे यूनिट बुटीबोरी परिसरात आहे. नागपूरला येण्यापूर्वी तो हैदराबाद येथे कार्यरत होता, असे सांगण्यात येते.

सोमवारी पहाटेपासून ही कारवाई करण्यात येत होती. निशांतने डीआरडीओशी संबंधित माहिती पुरवल्याचा आरोप आहे. विशेषत: ब्राह्मोसची माहिती दिल्याचा दिल्याचा संशय आहे. निशांतला २०१७-१८ मध्ये उत्कृष्ट शास्त्रज्ञ हा पुरस्कार मिळाल्याचेही सांगण्यात येते. या अटकेबाबत नागपूर पोलिसांनाही अधिक माहिती नाही. कोणताही अधिकारी याबाबत बोलायला तयार नाही. निशांत या क्षेपणास्त्रातील तांत्रिक गोपनीय माहिती पाकिस्तान आणि अमेरिकेच्या एजन्सीला पाठवत होता. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार एक पथक रविवारी रात्रीपासून त्याच्या मागावर होते. सोमवारी पहाटे छापा टाकल्यानंतर त्याला अटक करण्यात आली.

ब्राह्मोस हे क्षेपणास्त्र भारत आणि रशिया संयुक्तरित्या विकसित करत आहेत. मागील वर्षी येथे आधुनिक हत्यारांच्या यंत्रणेचे परीक्षण करण्यात आले होते. प्रशासन आणि एअरोस्पेस सेंटर दोघांनीही याप्रकरणी मौन बाळगले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button