breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण

“घड्याळातला छुपा कॅमेरा अन्…”; फडणवीसांच्या ‘त्या’ खळबळजनक व्हिडीओ क्लिपमधील वकील प्रवीण चव्हाणांनी मांडली बाजू

मुंबई |

मुंबईचे नवे पोलीस आयुक्त संजय पांडे यांच्या नियुक्तीसंदर्भात मोठा वाद निर्माण झाला असून देवेंद्र फडणवीस यांनी याच संदर्भातले काही गौप्यस्फोट केले. यावेळी फडणवीसांनी विधानसभेत काही व्हिडीओ क्लिप सादर केल्या. देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी विशेष सरकारी वकील प्रविण चव्हाण यांच्या संभाषणांच्या व्हिडीओ क्लिपमधील संभाषण वाचून दाखवलं. यामध्ये नवाब मलिक, शरद पवार, अनिल देशमुख, यांच्याबद्दलचे अनेक वादग्रस्त उल्लेख आले आहेत. या व्हिडीओ क्लिपवर आता सरकारी वकील प्रवीण चव्हाण यांनी स्पष्टीकरण दिलं आहे. चव्हाण य़ांनी देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केलेले आरोप फेटाळून लावले आहेत. चव्हाण यांनी म्हटलं आहे की, फडणवीसांनी पुढे आणलेल्या व्हिडीओमध्ये आपल्या वाक्यांची मोडतोड करण्यात आली असून सर्व रेकॉर्डिंग समोर येण्याची गरज आहे. त्याचबरोबर मूळचा जळगावचा असलेला तेजस मोरे नावाचा तरुण अशील म्हणून आपल्याकडे आला आणि त्याने हे स्टिंग ऑपरेशन केलं असल्याचंही चव्हाण यांनी एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं आहे.

प्रवीण चव्हाण यांनी म्हटलं की, व्हिडीओ आणि ऑडिओ वेगळे आहेत. वाक्ये अर्धवट वापरण्यात आली आहेत. माझ्या ऑफिसात अशील म्हणून येणाऱ्या तेजस मोरेने हे स्टिंग ऑपरेशन केलं आहे. त्यासाठी त्याने समोरच्या काचेच्या भिंतीवर लावायला घड्याळ भेट दिलं आणि त्यात छुपा कॅमेरा बसवला. तेजस मोरे तुरुंगात असून जामिनासाठी तो माझ्याकडे येत होता. “पवार साहेब तयार आहेत. जूनमध्ये संजय पांडे रिटायर होतो आहे. आता तो मुंबई सीपी झाला आहे. त्याने सांगितले की, मी केस रजिस्टर करून देतो. त्याच बोलीवर आपण त्याला बसविले आहे. मी रजिस्टर करायला लावतो, असे त्याने सांगितले आहे. जयंत पाटील साहेब बोलून घेतील. तुम्ही ईडीकडे तक्रार करा. मग त्यांनी कारवाई केली नाही की दर दोन दिवसांनी पत्रपरिषद घ्यायची. तुम्ही आरोप करा. मग आम्ही हायकोर्टात जाऊ. तोवर मेडिकलची फाईल सापडेल. भाजपाला १० कोटी रुपये देणगी मिळाली, याची तुम्ही तक्रार करा. या एका पत्रामुळे नवाब मलिकची चौकशी स्टॉप होईल”, असं व्हिडीओ क्लिपमधलं संभाषण देवेंद्र फडणवीसांनी सादर केलं होतं.देवेंद्र फडणवीसांच्या या गौप्यस्फोटांमुळे महाराष्ट्रातल्या राजकारणात खळबळ उडाली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button