breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

#Waragainstcorona: रेशनकार्ड नाही…चिंता कसली? : मावळ तालुक्यातील अन्नछत्रालयात मिळणार मोफत जेवण!

– आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने सहा ठिकाणी अन्नछत्रालय 

– लॉकडाउनकाळात तालुक्यातील एकाही व्यक्तीची उपासमार होणार नाही

मावळ । महाईन्यूज । प्रतिनिधी

महाराष्ट्र सरकारने रेशनकार्डधारक कुटुंबांना मोफत अथवा सवलतीच्या दरांमध्ये धान्य उपलब्ध केले आहे. मात्र, मावळात मोलमजुरी करणाऱ्या अनेक कुटुंबांकडे रेशनकार्ड नाही. अशा कुटुंबांनी लॉकडाउनच्या उपासमार होईल, अशी चिंता करण्याची आवश्यकता नाही. मावळचे आमदार सुनील शेळके यांच्या पुढाकाराने तालुक्यात सहा ठिकाणी अन्नधत्रालय सुरू करण्यात येणार आहेत. त्याठिकाणी रेशनकार्ड नसले तरी संबंधित नागरिकांना मोफत जेवण देण्यात येणार आहे. 

याबाबत बोलताना सुनील शेळके म्हणाले की, मावळ तालुक्यात सोमवारपर्यंत सहा वेगवेगळ्या ठिकाणी अन्नछत्रालय सुरू करण्यात येणार आहे. त्या माध्यमातून मोफत दोन वेळचे जेवण गरजूंना घरपोच देण्यात येणार आहे. तळेगाव दाभाडे, आंबी, वडगाव, लोणावळा, टाकवे, उर्से या ठिकाणी अन्नछत्रालय उभी राहणार आहेत, अशी माहिती मावळचे आमदार सुनील शेळके यांनी दिली.

याबाबत बोलताना आमदार सुनील शेळके म्हणाले की, ज्यांच्याकडे रेशनकार्ड नाही, असे अनेक मोलमजुरी करणारे कामगार लॉकडाऊनमुळे मावळ तालुक्यामध्ये अडकले आहेत. त्यांना दोन वेळचे अन्न त्यांच्या वस्तीपर्यंत घरपोच देण्याची व्यवस्था अन्नछत्रालयांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. ही अन्नछत्रालयाची योजना सुरू करीत असताना महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री, पुणे जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांना सूचना करून आपत्कालीन निधी म्हणून या अन्नछत्रालयासाठी वापरण्यात यावा, अशा सूचना दिलेल्या आहेत.

****

दानशूर, संस्था-संघटनांना आवाहन…

गरजू नागरिकांची संख्या मोठी असल्याने अन्नछत्रालयाची व्यवस्था करण्यात येत असली, तरी आजपर्यंत ज्यांनी कुणावरही उपासमारीची वेळ येऊ दिली नाही. अशा विविध दानशूर व्यक्ती व स्वयंसेवी संस्थांनी अन्नदानाचे उपक्रम लॉकडाऊन असेपर्यंत बंद करू नयेत. तालुक्यातील दानशूर व्यक्ती, सामाजिक संस्था यांनी परिस्थितीचे गांभीर्य ओळखून सामाजिक जबाबदारी जपत कुणाला धान्य, जीवनावश्यक वस्तू स्वरुपात मदत करावयाची असल्यास ती स्वीकारली जाईल, राज्य शासनाचा आपत्कालीन निधी व लोकसहभागातून ही अन्नछत्रालय लॉकडाऊन संपेपर्यंत चालू राहतील, असेही आमदार शेळके यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button