breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

बोपखेल उड्डाणपूलासाठी जागेची रक्कम भरणार ; स्थायी समितीची मान्यता

स्थायीची ३६ कोटी ३५ लाख ८८ हजार रुपये खर्चाची  विकास कामांना मान्यता 
पिंपरी – महापालिका हद्दीतील बोपखेलसाठीच्या मुळा नदीवरील उड्डाणपुलासाठी विना मोबादला आवश्यक जागा  देण्यास संरक्षण खात्याने नकार दिला. परंतू, संरक्षण खात्याने त्या जागेची २५ कोटी ८१ लाख ५१ हजार २०० रुपये भरण्यास सांगितले आहे. बोपखेलचा हा प्रश्न लवकरच मार्गी लागणार असून बोपखेलकरांची त्रासापासून मुक्तता होणार आहे. या संदर्भात महासभेकडे शिफारस केली आहे, अशी माहिती स्थायी समिती सभापीत ममता गायकवाड यांनी दिली.
स्थायी समितीच्या सभापती ममता गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ही सभा पार पडली. या सभेत रावेत येथील जलउपसा केंद्राची क्षमता वाढविण्याचा महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पिंपरी-चिचवड महानगरपालिका पाणीपुरवठा विभाग संपुर्ण शहराला पाणीपुरवठा करण्यासाठी रावेत येथे पवना नदीवर जलउपसा केंद्र आहे. रावेत जलउपसा केंद्राची क्षमता वाढविण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. येथील टप्पा ३ व ४ योजनेअंतर्गंत स्ट्रण्डबाय पंपसेट बसविणे आणि अनुशंगिक कामांची निविदा प्रक्रिया राबविण्यात आली आहे. या कामासाठी ४ कोटी ५८ वाख  ३ हजार ८८७ रुपये खर्च करण्यास स्थायी समितीने मान्यता दिली.
महानगरपालिकेच्या हद्दीतून १८० नैसर्गिक नाले आहेत. या नाल्यांची साफसफाई करण्यासाठी दरवर्षी निविदाप्रक्रिया राबविली जात होती. निविदा प्रक्रिया राबवून देखील नालेसफाई होत नाही. ठेकेदारांकडून केवळ बिले उकळण्याचे काम या मागाली काळात झालेले आहे. त्या संदर्भात भाजपने आपल्या काळात नालेसफाईसाठी निविदाप्रक्रिया बंद करण्यावर भर दिला आहे. खासगी व्यावसायिक कंपन्यांच्या सीएसआर फंडातून ही कामे करून घेण्याला प्राधान्य देण्यात येत आहे. तशी चर्चा स्थायी समितीच्या बैठकीत झाली असून यापुढे नालेसफाईसाठी निविदा न काढण्याचे धोरण अंवलंबविण्यात येणार आहे. रावेत येथील जलउपसा केंद्राची क्षमता वाढविण्यासाठीच्या कामांसाठी ४ कोटी ५८ लाख ३ हजार ८८७ रुपये खर्चासह सुमारे ३६ कोटी ३५ लाख ८८ हजार रुपये खर्चाच्या कामांना स्थायी समितीच्या सभेत बुधवारी मान्यता देण्यात आली.
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button