breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडी

बेरुत स्फोटानंतर आठवडाभरात लेबनॉनच्या संपूर्ण मंत्रिमंडळाचा राजीनामा

बेरुत | लेबनॉनची राजधानी बेरुतमध्ये झालेल्या शक्तिशाली आणि विद्ध्वंसक स्फोटानंतर आठवडाभरात सरकार पायउतार झालं आहे. लेबनॉनचे पंतप्रधान हसन दियाब यांनी बेरुत स्फोटांमुळे आपल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह राजीनामा दिला आहे. पंतप्रधान हसन दियाब यांनी सोमवारी (10 ऑगस्ट) संध्याकाळी राष्ट्रीय टेलिव्हिजनवर देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात स्वत: याची घोषणा केली.

पंतप्रधान हसन दियाब यांच्या राजीनाम्याआधी मंत्रिमंडळातील अनेक मंत्र्यांनी आपला राजीनामा दिला होता. मात्र संपूर्ण सरकारनेच राजीनामा देण्याची मागणी करण्यात येत होती. अखेर पंतप्रधानांनी संध्याकाळी देशाला उद्देशून केलेल्या संबोधनात राजीनामा देत असल्याची घोषणा केली. त्यांनी आपला राजीनामा लेबनॉनचे राष्ट्रपती मायकल आऊन यांच्याकडे सोपवला आहे.

दरम्यान, नवी मंत्रिमंडळाची स्थापना होईपर्यंत पदावर कायम राहा, असं राष्ट्रपतींनी पंतप्रधान हसन दियाब यांना सांगितलं आहे. सरकार भ्रष्टाचारी आणि अयोग्य असल्याचा आरोप लेबनॉनची जनता करत होती. सलग तीन ते चार दिवसांपासून संतप्त नागरिकांचं आंदोलन सुरु असून अनेक ठिकाणी आंदोलकांची पोलिसांसोबत झटापटही झाली. अनेक वर्षांपासून बंदरावर असुरक्षित पद्धतीने ठेवलेल्या 2750 टन अमोनियम नायट्रेटचा मागील मंगळवारी स्फोट झाला, ज्यात 200 पेक्षा जास्त नागरिकांचा मृत्यू झाला तर हजारो लोक जखमी झाले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button