breaking-newsमहाराष्ट्र

अकरावी ऑनलाईन प्रवेशाचे पुढील वेळापत्रक जाहीर

मुंबई : अकरावी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेला मागील महिन्यात सुरुवात झाल्यानंतर विद्यार्थ्यांना 26 जुलैपासून विद्यार्थ्यांना प्रवेशाचा भाग-1 भरण्यास वेळ दिला होता. त्यानंतर आता अकरावी प्रवेश अर्जाचा भाग- 2 विद्यार्थ्यांना 12 ऑगस्टपासून भरायचा आहे. यामध्ये विद्यार्थ्यांना आपले कॉलेज पसंतीक्रम भरायचा आहे.

शिक्षण संचालनालयाने अखेर सोमवारी (10 ऑगस्ट) अकरावी ऑनलाईन प्रवेश पहिल्या गुणवत्ता यादीपर्यंतचे वेळापत्रक जाहीर केले. या वेळापत्रकानुसार पहिली गुणवत्ता यादी 30 ऑगस्टला जाहीर होणार आहे. ज्या विद्यार्थ्याचा प्रवेश अर्जाचा भाग 1 अजूनही भरणे बाकी आहे त्यांना सुद्धा भाग 1 आणि भाग-2 सोबत भरायची संधी आहे. सोबतच 12 ऑगस्टपासून अल्पसंख्यांक, इनहाऊस आणि व्यवस्थापन कोट्यातील प्रवेश आणि पहिल्या गुणवत्ता यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम भरण्यास सुरुवात होणार आहे.

या केंद्रीय प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक मुंबईसह पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, औरंगाबाद, अमरावती आणि नागपूर महापालिका क्षेत्रासाठी लागू असणार आहे. माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे संचालक दिनकर पाटील यांनी अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रियेचे वेळापत्रक प्रवेशाच्या वेबसाईटवर जाहीर केले. या वेळापत्रक अर्जाचा भाग 2 ते पहिल्या गुणवत्ता यादीपर्यंत वेबसाईटवर दिले आहे पुढील प्रवेश फेरी तसेच विशेष फेऱ्यांचे वेळापत्रक नंतर जाहीर करण्यात येतील

अकरावी ऑनलाईन प्रवेशप्रक्रिया वेळापत्रक

  • 12 ते 22 ऑगस्ट : अर्जाचा भाग 2 भरणे. यामध्ये पहिल्या नियमित गुणवत्ता यादीसाठी कॉलेज पसंतीक्रम नोंदविणे, कोट्याअंतर्गत प्रवेश, कोट्यातील शिल्लक जागा ऑनलाईनसाठी उपलब्ध करणे.
  • 23 ते 25 ऑगस्ट : तात्पुरती- संभाव्य गुणवत्ता यादी जाहीर होणार. यामध्ये सर्व पात्र विद्यार्थ्याचा समावेश असणार. यादीवर हरकती, आक्षेप विद्यार्थ्यांना नोंदवता येणार.
  • 30 ऑगस्ट : अकरावी प्रवेशाची पहिली गुणवत्ता यादी जाहीर होणार
  • 31 ऑगस्ट ते 3 सप्टेंबर : संबंधित कॉलेजमध्ये ऑनलाईन प्रवेश निश्चित करण्यात येणार

ज्या विद्यार्थ्याला पहिल्या पसंती क्रमांकाचे कॉलेज मिळाले त्यांना त्या कॉलेजात प्रवेश घेणे बंधनकारक असणार आहे. प्रवेश न घेतल्यास त्यांना विशेष फेरीपर्यत थांबावे लागेल. शिवाय ज्यांनी पहिल्या फेरीत पहिला सोडून इतर पसंती क्रमांकाचे कॉलेज मिळून सुद्धा प्रवेश निश्चित केले नाही अशा विद्यार्थ्यांना पुढील फेरीमध्ये सहभागी होता येईल.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button