breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्रमुंबईराजकारण
‘बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य प्राणी होता येत नाही’, शेलारांची राष्ट्रवादीवर टिका
मुंबई | महाईन्यूज
आगामी मुंबई महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीने मुंबईत मेळावा घेतला. मेळाव्यात उपमुख्यमंत्री यांनी कार्यकर्त्यांना सूचना दिल्या. भाजप नेते आशिष शेलार यांनी ट्विटच्या माध्यातून टोला लगावला. ‘राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60, तर दुसरे म्हणतात 50 जिंकू… आहेत त्या 8 जागा टिकल्या तरी खूप झाले’, असं ट्विट करत आशिष शेलारांनी अजित पवार आणि राष्ट्रवादीवर निशाणा साधला.
बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येतं ? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर.. विनोदीच आहे सगळं ! पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!”, असं ट्विट आशिष शेलार यांनी केलं आहे.