breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी आक्रमक : भाजपाच्या भ्रष्टाचाराविरोधात उद्या निषेध मोर्चा

  • शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांची पदाधिकारी-कार्यकर्त्यांना साद

  • डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात भाजपाविरोधी रोष उफाळणार

पिंपरी । प्रतिनिधी

पिंपरी-चिंचवड महापालिकेतील सत्ताधारी भाजपाविरोधात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीने आता आक्रमक भूमिका घेतली आहे. भाजपविरोधात उद्या, दि.२५ ऑगस्ट रोजी महापालिका भवनावर निषेध मोर्चा काढण्यात येणार आहे, अशी माहिती राष्ट्रवादीचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी दिली.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक ते महापालिका भवन असा मोर्चा काढण्यात येणार आहे. त्यासाठी शहरातील प्रमुख नेते, सर्व सेल अध्यक्ष, कार्यकत्यांनी उपस्थित रहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.

आजी-माजी आमदार सहभागी होणार?

पिंपरी-चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे पिंपरी विधानसभा मतदार संघाचे आमदार अण्णा बनसोडे आणि भोसरीचे माजी आमदार विलास लांडे राष्ट्रवादी मातब्बर नेते आहेत. शहरातील पार्टीच्या बहुतेक आंदोलनाला या नेत्यांची अनुपस्थिती दिसते. त्यामुळे शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांच्या आवाहनाला साद देत आजी-माजी आमदार आंदोलनात सहभागी होतात का? हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button