breaking-newsTOP Newsताज्या घडामोडीपुणे

डिजिटल मिडियातील संपादक आणि पत्रकारांना संचारबंदी निर्बंधातून सूट द्यावी!

  • ज्येष्ठ पत्रकार राजा माने यांची मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे मागणी

पुणे |महाईन्यूज|

राज्यात कोविड-19 महामारीचा प्रादुर्भाव झपाट्याने वाढत आहे. दररोज हजारो रुग्ण वाढू लागल्याने आरोग्य वैद्यकीय यंत्रणेवर ताण येत आहे. कोविड रुग्णांची साखळी तोडण्यासाठी ब्रेक द चेन ही मोहीम राज्य सरकार राबवित आहे. तसेच राज्यात आज रात्री आठ वाजल्यापासून संचारबंदी लागू करण्यात आलेली आहे. यामध्ये केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांना संचारबंदीतून निर्बंधमुक्त करण्यात आलेले आहे. त्यामुळे डिजिटल मीडियातील संपादक व पत्रकारांना देखील संचारबंदीत काम करण्यास सूट द्यावी, अशी मागणी डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटनेचे अध्यक्ष राजा माने यांनी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे केली आहे.

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना दिलेल्या पत्रात म्हटले आहे की, डिजिटल मिडियाचा प्रसार गाव पातळीपर्यंत पोहोचला आहे, हे आपण जाणताच. कोविड महामारी संकट काळात महाराष्ट्र शासनाच्या कार्यास पूरक असे काम डिजिटल मिडिया संपादक पत्रकार संघटना महाराष्ट्र करीत आहे. राज्यात प्रशासन आणि जनता यांच्यातील विधायक व सकारात्मक संवादातील महत्त्वाचा दुवा म्हणून न्यूज पोर्टल्स, न्यूज यू ट्यूब चैनल्स, न्यूज वेबसाईटस् आणि विविध ऑनलाइन आवृत्त्यांचे संपादक, वार्ताहर, फोटो व व्हिडीओ ग्राफर्स करीत आहेत.

कोविड महामारीची साखळी तोडण्यासाठी आपण राज्यात जाहीर केलेल्या संचारबंदीचे आम्ही स्वागत करतो. या कालावधीत आपण केवळ अधिस्वीकृतीधारक पत्रकारांनाच संचारबंदी निर्बंधमुक्त केले. डिजिटल मिडिया अधिस्वीकृती संदर्भात केंद्र व राज्य शासनाने अद्याप कुठलीही यंत्रणा अथवा मान्यता पध्दती विकसित केलेली नाही. त्यामुळे संचारबंदी काळात डिजिटल मिडियात कर्तव्य बजावणाऱ्यांची गैरसोय होईल. राज्यातील डिजिटल मिडियातील संपादक आणि सर्व पत्रकारिता घटकांना संचारबंदी निर्बंधातून सूट द्यावी आणि तशा सूचना गावपातळीवर निर्गमित कराव्या, असेही म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button