breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

बा… देवा, विठ्ठला!

  • राज्यातील बळीराजाला सुखी ठेव, सर्वांच्या मनोकामना पुर्ण करा!

  • मुख्यमंत्र्यांचे विठूरायाला साकडे

  • वर्षा निवासस्थानी केली विठ्ठल-रुक्‍मिणींची पूजा

मुंबई – बा…देवा, विठ्ठला! माझ्या राज्यातील बळीराजाला सुखी ठेव, सकलजनांच्या सर्व मनोकामना पुर्ण होऊ दे आणि महाराष्ट्राच्या यशाची पताका सदैव उंच फडकत राहू दे…असे मनोभावे साकडे आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पांडुरंगाच्या चरणी घातले.

आषाढी वारी ही महाराष्ट्राची उज्ज्वल परंपरा असून जनतेच्यावतीने विठ्ठलाचा सेवक म्हणून राज्याच्या मुख्यमंत्र्याला पांडुरंगाच्या महापूजेचा पहिला मान दिला जातो. परंतु, यंदा मुख्यमंत्र्यांना या शासकीय पुजेतून माघार घ्यावी लागली. मराठा समाजाला आरक्षण मिळालेच पाहिजे, दिलेल्या आश्वासनांची पुर्तता करण्याच्या मागणीसाठी गेले दोन दिवस राज्यातील विविध भागात आंदोलन सुरु आहेत.

शनिवारी सोलापूरात या आंदोलनाला हिंसक वळण लागले. मुख्यमंत्र्यांनी पांडुरंगाच्या महापुजेचा हट्ट सोडून द्यावा, आधी आरक्षण जाहीर करावे आणि मगच पंढरपुरात यावे, अन्यथा गनिमीकाव्याने आंदोलन करण्यात येईल, असा इशारा काही संघटनांनी दिला होता.

या इशाऱ्यांमुळे आषाढी एकादशीनिमित्त पंढरपुरमध्ये दाखल झालेल्या वारकऱ्यांची फरफट होऊ नये यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना रविवारी पंढरपूर येथे विठ्ठलाच्या महापूजेला येण्याचा निर्णय बदलला आणि पांडुरंगाच्या महापुजेसाठी पंढरपूरला जाणार नसल्याचे स्पष्ट केले. विठ्ठलाचा सेवक म्हणून माझ्या घरी विठ्ठलाची पूजा करायला मला आवडेल, असेही ते म्हणाले होते.

त्यापार्श्वभूमीवर आषाढी एकादशीनिमित्त मुख्यमंत्र्यांनी आज वर्षा या आपल्या शासकीय निवासस्थानी सपत्नीक, कुटुंबीयांसह मनोभावे, विठोबा-रखुमाईच्या मूर्तीचे पूजन केले. त्यावेळी त्यांनी राज्यातील जनतेच्या सुखी जीवनासाठी विठ्ठल-रुक्‍मिणीला साकडे घातले.

‘त्या’ मुर्तीमुळेच मुख्यमंत्री बचावले होते 
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे मे 2017 मध्ये लातूर दौऱ्यावर गेले असता त्यांच्या हेलिकॉप्टरला भीषण अपघात झाला होता. सुदैवाने त्यांना कोणतीही इजा झालेली नव्हती. या दौऱ्यात खरोसा टेकडीवरच्या कीर्तनाच्या कार्यक्रमादरम्यान वसंत पाटील या भाजपाच्या कार्यकर्त्याने मुख्यमंत्री फडणवीस यांना विठठल-रखुमाईची एक मुर्ती भेट दिली होती.

मुख्यमंत्र्यांनी हेलिकॉप्टर प्रवासात ही मुर्ती आपल्या सोबतच ठेवली होती. इतक्‍या गंभीर अपघातात हेलिकॉप्टरच्या केबिनची संपूर्ण हानी झाली पण ही मुर्ती आणि आपण पूर्णपणे सुखरूप होतो. या मुर्तीला मुख्यमंत्र्यांनी आपल्या पूजाघरात ठेवली आहे. याच मुर्तीची त्यांनी सोमवारी पूजा केली. ट्‌वीटरवर मुख्यमंत्र्यांनीच हा अनुभव शेअर केला आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button