ताज्या घडामोडीमहाराष्ट्र

अहमदनगर महाकरंडक’मध्ये अऽऽऽय ठरली सर्वोत्कृष्ट एकांकिका

अहमदनगर | हौशी रंगकर्मींच्या कलाविष्काराला प्रोत्साहन देणारी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठी एकांकिका स्पर्धा ‘अहमदनगर महाकरंडक २०२२, उत्सव रंगभूमीचा नवरसांचा’ची महाअंतिम फेरी जल्लोषात अहमदनगर येथील माऊली सभागृहात मान्यवरांच्या उपस्थित पार पडली. यावेळी नाट्यमल्हार प्रतिष्ठान, अहमदनगरच्या ‘अऽऽऽय…!’ या एकांकिकेने प्रथम तर अ‍ॅबस्ट्रॅक्ट आर्ट डोंबिवलीच्या ‘हायब्रीड’ ह्या एकांकिकेने द्वितीय क्रमांक पटकावला. विजेत्या संघाला १ लाख ११ हजार आणि उपविजेत्या संघाला ५१ हजार १११ रुपयांचे पारितोषिक मिळाले. अहमदनगर महाकरंडक समितीचे अध्यक्ष नरेंदजी फिरोदिया, सुपरस्टार स्वप्नील जोशी, आमदार संग्राम जगताप यांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरण सोहळा पार पडला. तर अंतिम फेरीसाठी परीक्षक म्हणून दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी, अभिनेत्री-निर्माती श्वेता शिंदे आणि अभिनेता-दिग्दर्शक अद्वैत दादरकर यांनी काम बघितले.

ओटीटीच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना नक्कीच संधी देऊ…

नरेंद्र फिरोदिया आणि स्वप्नील जोशी यांच्या आगामी बहुभाषिक १ ओटीटी या प्लॅटफॉर्मवर येणाऱ्या ‘काम करी दाम’ या वेब सिरीजचा टिझर यावेळी लाँच करण्यात आला. आगामी ओटीटी आणि महाकरंडकविषयी बोलताना स्वप्नील जोशी म्हणाला की, ‘ही स्पर्धा आता वेगळ्या उंचीवर पोहोचली आहे. कमालीचे आयोजन भव्यता हे या स्पर्धेचं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून आलेल्या एकांकिका या ठिकाणी बघता येतात. त्यामुळे ही पर्वणीचं आहे. आम्ही १ ओटीटीच्या माध्यमातून नवोदित कलाकारांना नक्कीच संधी देऊ’, असं आश्नासन स्वप्नीलने यावेळी दिलं.

२ वर्षं कोविडमुळे स्पर्धा होऊ शकली नव्हती…

४ दिवस रंगलेल्या या स्पर्धेविषयी बोलताना नरेंद्रजी फिरोदिया म्हणाले की, २ वर्षं कोविडमुळे स्पर्धा होऊ शकली नव्हती. आम्हाला पण घाई नव्हती. कारण ५० टक्के उपस्थितीत ही स्पर्धा आम्हाला घ्यायची नव्हती. तसेच व्यासपीठावर सादर होणाऱ्या एकांकिका आता डिजिटल स्वरूपात पाहायला मिळणार आहेत. नवोदित कलाकारांना १ ओटीटीवर संधी मिळणार असल्याची घोषणाही यावेळी फिरोदिया यांनी केली.

नाटक ही सर्वश्रेष्ठ कला आहे आणि ही कला सांघिक कामगिरीवर अवलंबून असते, असे प्रतिपादन स्पर्धेचे परीक्षक चंद्रकांत कुलकर्णी यांनी स्पर्धेच्या अंतिम सोहळ्यात केले. सर्व एकांकिकांचे कौतुक तर त्यांनी केलेच तसेच स्पर्धेच्या उत्तम नियोजनाचे कौतुकही केले. स्पर्धेत प्रथम आलेल्या अऽऽऽय…! या एकांकिकेचं दोन अंकी व्यावसायिक नाटकात रूपांतर करून त्याची निर्मिती करणार असल्याची घोषणाही त्यांनी यावेळी केली.

 

राज ठाकरेंना दादा भुसेंनी सुनावलं, काढली बाळासाहेबांची आठवण !

गुणी कलाकारांना झी मराठीच्या येणाऱ्या प्रोजेक्ट्समध्ये संधी देणार…

नाटक जगा आणि रंगभूमीची सेवा करत रहा, असं सांगताना गुणी कलाकारांना झी मराठीच्या येणाऱ्या प्रोजेक्ट्समध्ये संधी देणार असल्याचं अद्वैत दादरकर यांनी पारितोषिक वितरण प्रसंगी सांगितलं. तसेच महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातलं जगणं बघायला मला आवडतं. प्रत्येक भागातून आलेल्या मुलांनी त्यांचं जगणं इथे मांडलं हे कौतुकास्पद असल्याचं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.

परीक्षक श्वेता शिंदे यांनी स्पर्धेच्या पारितोषिक सोहळ्यात बोलताना स्पर्धेच्या नियोजनाचे कौतुक केले. त्या म्हणाल्या की, ‘वेब सिरीजच्या जास्ती जाऊ नका, नाटक हे नाटकासारखचं व्हायला हवं. संवादाच्या बाबतीत सतर्क राहायला हवं. जास्तीत-जास्त रिअ‍ॅलिस्टीक लिहिण्याचा प्रयत्न करा’, असा सल्ला त्यांनी यावेळी दिला. तसेच नवोदित कलाकार, दिग्दर्शकांना आपल्या प्रोडक्शन हाऊसच्या कलाकृतींमध्ये संधी देणार असल्याची घोषणा देखील त्यांनी यावेळी केली.

घरोट, दोरखंड, जनावर, काली, जखणाई, सोडवणूक, कुस्ती, जो जे वांछील, बारस, बिली मारो सारख्या अनेक एकांकिकांनी यावेळी प्रेक्षकांचे लक्ष वेधले…

अनुष्का मोशन पिक्चर्स अ‍ॅण्ड एंटरटेन्मेंट आणि शांतीकुमारजी फिरोदिया मेमोरियल फाउंडेशन प्रायोजित, श्री महावीर प्रतिष्ठान आयोजित आणि झी-मराठीच्या सहयोगाने झालेल्या या स्पर्धेत १२० एकांकिकांमधून ३३ एकांकिकांची अंतिम फेरीत निवड करण्यात आली होती. ४ दिवस चाललेल्या या स्पर्धेला अभूतपूर्व प्रतिसाद मिळाला.

‘आय लव्ह नगर’च्या संयुक्त विद्यमाने झालेल्या या स्पर्धेचे ऑनलाईन स्ट्रिमिंग पार्टनर म्हणून १ ओटीटी तसेच डिजीटल पार्टनर म्हणून ‘लेटस्-अप’ आणि ‘खासरे टीव्ही’ हे होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button