breaking-newsमनोरंजन

बाळासाहेब ठाकरे जसे होते तसेच स्क्रीनवर दिसणार- संजय राऊत

मुंबई- ‘ठाकरे’ चित्रपट सेन्सॉरच्या कात्रीत अडकला आहे. आज दुपारी चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित होणार असतानाच सेन्सॉरनं आक्षेप नोंदवल्यानं मोठा पेच निर्माण झाला आहे. त्यावर कसा तोडगा काढला जातो, हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. सेन्सॉर बोर्डानं या चित्रपटातील काही दृश्यं व संवादांवर आक्षेप घेतला आहे.

दरम्यान, शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले, सेन्सॉर बोर्डाच्या आक्षेपानंतरही सिनेमाचा ट्रेलर रिलीज करण्यात येणार आहे. सामाजिक आणि राजकीय जीवनात बाळासाहेब ठाकरे यांनी 50 वर्षांहून अधिक काळ घालवला आहे. बाळासाहेब ठाकरे जसे होते, त्याप्रमाणेच त्यांना मोठ्या पडद्यावर दर्शवण्यात आले आहे. यावर आक्षेप नोंदवण्याची काहीही गरज नाही. या सिनेमाची निर्मिती  खासदार संजय राऊत यांनी केली आहे.

देशात सध्या राम मंदिर उभारणीचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. अशा वातावरणात हे संवाद चित्रपटातून आल्यास वाद निर्माण होऊ शकतो, असं सेन्सॉर बोर्डाचं मत असल्याचं सूत्रांकडून समजतं. बॉलिवूडचा प्रसिद्ध अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी ‘ ठाकरे’ चित्रपटात बाळासाहेबांची व्यक्तिरेखा साखरणार आहे. ठाकरे चित्रपटाचे पोस्टर आधीच प्रसिद्ध झाले असून सोशल मीडियात नवाजच्या लूकची जोरदार चर्चा आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button