breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

वैद्यकीय अधिकारी डाॅ. अनिल राॅय यांचे आर्थिक अधिकार काढण्याचा स्थायीचा निर्णय

पिंपरी ( महा ई न्यूज ) –  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या वैद्यकीय विभागाचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय यांच्या अधिकारात स्थायी समितीने बुधवारी (दि.२५) आणखी घट केली. वैद्यकीय विभागातील खरेदीचे अधिकार व  वायसीएम रुग्णालयाचा पदभार काढून घेतल्यानंतर आता त्यांचे सर्व आर्थिक अधिकार काढून घेण्याचा निर्णय स्थायी समिती बैठकीत घेतला आहे.

स्थायी समितीच्या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड  होत्या.  पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या कारभारात वैद्यकीय विभागातील आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अनिल रॉय व अतिरिक्त आरोग्य वैद्यकीय अधिकारी  डॉ. पवन साळवे यांच्यात पदोन्नतीवरून अनेक वर्षांपासून वाद सुरू आहे. नुकताच महापालिका सर्वसाधारण सभेत डॉ. रॉय यांच्याऐवजी डॉ. साळवे यांना पदोनन्नती देण्याचा निर्णय महापालिका सत्ताधा-यांनी घेतला आहे. दोन्ही डॉक्टरांच्या या प्रशासकीय वादात महापालिका सत्ताधा-यांनी उडी घेतल्यानंतर हे प्रकरण आणखीच वाढले आहे.

डॉ. रॉय यांच्याकडून खरेदीचे अधिकार काढून घेण्यात आले. तसेच, काही दिवसांपूर्वी त्यांच्याकडून यशवंतराव चव्हाण स्मृती (वायसीएम) रुग्णालयाचे विभागप्रमुखपद काढून घेत ते डॉ. साळवे यांना देण्यात आले होते. या प्रकरणी त्यांनी उच्च न्यायालयात महापालिकेच्या विरोधात दावा देखील केला आहे. मात्र, त्यानंतर स्थायी समितीने डॉ. रॉय यांना आणखी एक झटका दिला. स्थायी समितीने त्यांच्याकडील आर्थिक अधिकार काढून घेत अतिरिक्त आयुक्त डॉ. प्रवीण अष्टीकर यांच्याकडे देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे विभागप्रमुख असून देखील डॉ. रॉय यांच्याकडे निविदा प्रक्रिया राबविणे, करारनामा करणे, कामाचे आदेश देणे हे अधिकार राहणार नाहीत, अशी माहिती स्थायी समिती सदस्य तथा नगरसेवक विलास मडेगिरी यांनी दिली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button