breaking-newsपुणे

कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी सुक्ष्म नियोजन: विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर

पुणे ।महाईन्यूज । प्रतिनिधी

सातारा जिल्ह्यात कोरोना बाधित रुग्णांचे प्रमाण वाढले असून  जिल्हा रेड झोनमध्ये  आहे.  एक चांगली बाब म्हणजे मृत्युचे प्रमाण कमी आहे. आरोग्य विभागाबरोबरच प्रशासन व पोलीस चांगले काम करीत असून  आणखी रुग्ण वाढणार नाहीत,यासाठी सर्वांनी सुक्ष्म नियोजन करुन संसर्गाची साखळी तोडण्यासाठीप् प्रयत्न करावे,अशा सूचना विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी  केल्या.

    विभागी आयुक्त आज सातारा जिल्हा दौऱ्यावर होते.कराड येथील विश्रामगृहात कोरोना संसर्गाबाबत जिल्हा प्रशासन काय उपायोजना करीत आहे, त्याचा सविस्तर आढावा आज विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी घेतला. या बैठकीला जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय भागवत, पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, कराडचे प्रांताधिकारी उत्तम दिघे, तहसीलदार अमरदिप वाकडे, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. आमोद गडीकर, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अनिरुद्ध आठल्ये यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

बैठकीच्या प्रारंभी जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी कोरोना संदर्भात जिल्हा प्रशासन करत असलेल्या उपाययोजनांची माहिती संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली.

प्रतिबंधित क्षेत्र सोडून जिल्हाधिकारी हे लॉकडाऊनमध्ये सुट देत आहेत, असे सांगून विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर पुढे म्हणाले, शासनाच्या सूचनेनुसार जिल्ह्यातील बाजारपेठेंबाबत निर्णय घेतील. जिल्हा प्रशासन कोरोना संसर्ग वाढू नये, म्हणून युद्ध पातळीवर काम करीत आहे. ग्रामीण भागातील नागरिकांच्या हाताला काम मिळावे, यासाठी  रोजगार हमी योजनेच्या कामांना मंजुरी द्यावी.

नागरिकांनी विनाकारण घराबाहेर पडू नये. आपल्याबरोबर आपल्या घरातील ज्येष्ठ, लहान मुलांची काळजी घ्यावी. ज्येष्ठ नागरिकांनी व लहान मुलांनी घराबाहेर पडू नये.

कोरोना बाधित रुग्णांवर कराड येथील कृष्णा मेडिकल कॉलेजमध्ये उपचार करण्यात येतात. या मेडिकल कॉलेजला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी भेट देवून रुग्णांना देण्यात येणाऱ्या उपचार व सुविधांची माहिती जाणून घेतली. यावेळी कराड चॅरिटेबलचे अध्यक्ष डॉ. सुरेश भोसले व कॉलेज आणि हॉस्पिटलचे डीन डॉ.ए.वाय. क्षीरसागर यांनी सविस्तर माहिती दिली.

कटेंनमेंट झोन असणाऱ्या  मलकापूर येथील अहिल्यानगर व सातारा येथील सदरबझार या भागाला विभागीय आयुक्त डॉ. दिपक म्हैसेकर यांनी भेट देऊन तिथल्या परिस्थितीचा संबंधित अधिकाऱ्यांकडून सविस्तर आढावा घेतला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button